माझगाव डाॅकमध्ये 366 व्हेकन्सी, 8वी-10वी पास असलेल्यांनी 'असा' करा अर्ज

माझगाव डाॅकमध्ये 366 व्हेकन्सी, 8वी-10वी पास असलेल्यांनी 'असा' करा अर्ज

Mazagon Dock Recruitment, Jobs - माझगाव डाॅकमध्ये नोकरीची मोठी संधी आहे. अर्ज करायचा कसा ते घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 8 जुलै : माझगाव डाॅक शिपयार्ड लिमिटेडनं रिगर आणि इलेक्टिशियन पदांसाठी 366 व्हेकन्सीज काढल्यात. त्यात रिगर पदासाठी 217 व्हेकन्सीज आहेत आणि इलेक्ट्रिशियन पदासाठी 149 व्हेकन्सीज आहेत. या पदांची भरती 2 वर्षाच्या काॅन्ट्रॅक्टच्या आधारे होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 26 जुलै.

रिगर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 8वी पास असला पाहिजे. उमेदवारनं रिगर, फिटर ट्रेडमध्ये एनएसी सर्टिफिकेट कोर्स केला असला पाहिजे. इलेक्ट्रिशियन पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10वी उत्तीर्ण असायला हवेत. सोबत संबंधित ट्रेडचं प्रमाणपत्र हवं.

सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे बुडाले 3.20 लाख कोटी रुपये

दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कमीत कमी एक वर्षाचा अनुभव हवा. याचं सर्टिफिकेट एचआर डिपार्टमेंटच्या वतीनं जारी केलं होतं. अनुभवाचे 20 मार्क्स मिळतील.

रिगर पदासाठी पगार 17 हजार ते 64,360 रुपये आहे. इलेक्ट्रिशियन पदासाठीचा पगार 13,200 ते 49,910 रुपये आहे.

नौदलात 'या' पदांवर व्हेकन्सी, 'अशी' होईल निवड

दोन्ही पदांसाठी उमेदवारांनी आॅनलाइन www.mazagondock.in वर अर्ज करावा. माझगाव डाॅक शिपबिल्डर्स लिमिटेडकडे मिळालेल्या अर्जातून उमेदवार निवडला. लिखित परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना ट्रेड टेस्ट द्यावी लागेल. शेवटची सिलेक्टेड लिस्ट लिखित परीक्षा, ट्रेड टेस्ट आणि अनुभवाला मिळालेले मार्क्स याआधारे काढली जाईल. लिखित परीक्षा 30, अनुभव 20 आणि ट्रेड टेस्ट 50 टक्के असं मूल्यांकन मिळेल.

World Cup: टीम इंडियाकडे शेवटची संधी; 44 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेणार!

उमेदवाराचं वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावं. आरक्षित वर्गाच्या उमेदवाराला नियमाप्रमाणे वयात सवलत मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांची परीक्षा 5 आॅगस्ट 2019 ला होईल. परीक्षा आणि ट्रेड टेस्टची संभावित तारीख 13 आॅगस्ट आहे.

असा करा अर्ज

www.mazagondock.inवर लाॅग इन करा

होमपेजवर करियर सेक्शनमध्ये ‘करियर-नॉन एग्झिक्युटिव’वर क्लिक करा

नव्या पेजवर 1/7/2017 प्रमाणे RECRUITMENT OF RIGGERS & ELECTRICLAN ON FIX TERM CONTRACT BASIS FOR AMAXIMUM PERIOD OF 02 YRS लिंकवर क्लिक करा

करियर आणि पुन्हा नाॅन एक्झिक्युटिव्ह लिंकवर जा

नव्या पेजवर क्रिएट न्यू अकाउंट वर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन फाॅर्म भरा

कम्प्युटर जनरेटेड अर्ज फाॅर्मची प्रिंटआउट काढा.

VIDEO: वारकऱ्यांसाठी नवनीत राणांकडून स्पेशल ट्रेन, पावसासाठी विठुरायाकडे साकडं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 8, 2019 04:44 PM IST

ताज्या बातम्या