ONGC च्या नाॅन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी असं डाऊनलोड करा अ‍ॅडमिट कार्ड

ONGC, Admit Card - ONGC च्या परीक्षांचं अ‍ॅडमिट कार्ड आलंय. जाणून घ्या त्याबद्दल -

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 05:49 PM IST

ONGC च्या नाॅन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी असं डाऊनलोड करा अ‍ॅडमिट कार्ड

मुंबई, 8 जुलै : ONGCच्या नाॅन एक्झिक्युटिव्ह स्किल टेस्ट आणि फिजिकल स्टॅंडर्ड टेस्टचं  अ‍ॅडमिट कार्ड जारी झालंय. उमेदवार www.ongcindia.com या वेबसाइटवर जाऊन अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. परीक्षा कधी आहे ते अ‍ॅडमिड कार्डावर सांगितलं जाईल. परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार 10 जुलै ते 13 जुलैच्या मधे होणाऱ्या स्किल टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये भाग घेऊ शकतात.

ऑइल अँड नॅचरल गॅस काॅर्पोरेशन लिमिटेड ( ONGC )नं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं होतं. त्यात मेडिकल अधिकारी आणि इतर पदांवर भरती करायची आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन अर्ज करायचा होता.  42 मेडिकल ऑफिसर्स, 24 सिक्युरिटी ऑफिसर्स, 31 फायनान्स आणि एन्कांउटर ऑफिसर्स, 1 पर्यावरण आणि 9 फायर ऑफिसर्ससाठी जागा भरायच्या आहेत.

माझगाव डाॅकमध्ये 366 व्हेकन्सी, 8वी-10वी पास असलेल्यांनी 'असा' करा अर्ज

असं डाउनलोड करा अ‍ॅडमिट कार्ड

अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी  www.ongcrecruit.in या लिंकवर जा

Loading...

तुम्ही किराणा आणि भाजीपाला ऑनलाइन मागवता का?

वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या ओएनजीसी नॉन एग्झिक्युटिव स्किल टेस्ट, पीएसटी एडमिट कार्ड 2019 या लिंकवर क्लिक करा

लिंकवर क्लिक केलं तर नवं पेज ओपन होईल

नव्या पेजवर मागितलेली माहिती भरून सबमिट करा

पराभवानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच जाणार अमेठीला

सबमिट बटनावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर अ‍ॅडमिट कार्ड दिसेल

त्याची प्रिंट आउट तुमच्या जवळ ठेवा

काॅम्प्युटर बेस्ट परीक्षा

परीक्षा काॅम्प्युटर बेस्ट असेल. ONGC च्या वेगवेगळ्या पदांसाठी निगेटिव्ह मार्किंग, टायपिंग टेस्ट, फिजिकल टेस्ट किंवा पर्यायी उत्तरांचे प्रश्न असतील. नोटिफिकेशनमध्ये असा उल्लेख आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ongc
First Published: Jul 8, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...