Home /News /money /

वर्षभरानंतर आले 'अच्छे दिन'! मोदी सरकारने रोजगारासंबंधी दिली दिलासादायक बातमी

वर्षभरानंतर आले 'अच्छे दिन'! मोदी सरकारने रोजगारासंबंधी दिली दिलासादायक बातमी

EPF account

EPF account

कोरोना काळात अनेक जणांचा रोजगार गेला. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यावर लोकांना रोजगार मिळाला हे सांगणारी आकडेवारी कर्मचारी राज्य विमा महामंडळाने जारी केली आहे.

    नवी दिल्ली, 23 एप्रिल कोरोनाच्या संकटात (Coronavirus) अनेकांवर बेरोजगारीचंही संकट ओढावलं. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये (Corona lockdown) कित्येकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. कित्येकांचा व्यवसाय बंद झाला आणि पोटापण्याचा प्रश्न निर्माण झाला. वर्षभर कसं कसं करून अनेकांनी आपला उदरनिर्वाह केला. या वर्षातही कोरोनाचा कहर कायम आहे. पण तरी नागरिकांसाठी अच्छे दिन आहेत. मोदी सरकारने रोजगाराबाबत दिलायादायक अशी आकडेवारी जारी केली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (Employees State Insurance Corporation) कार्यान्वित सामाजिक सुरक्षा योजनेत म्हणजे ईएसआयसीमध्ये (ESIC) 11.58 लाख नवीन सदस्यांची भर पडली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात 11.78 लाख सभासद जोडले गेले होते. शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली असून, यात देशाच्या संघटित क्षेत्रात रोजगाराच्या परिस्थितीचे सविस्तर माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (National Statistical Office) प्रसिद्ध केलेल्या अहवालाच्या आकडेवारीनुसार, जून 2020 मध्ये 8.87 लाख सभासद, मेमध्ये 4.89 लाख आणि एप्रिलमध्ये 2.63 लाख सभासद जोडले गेलेत. हे वाचा -  कोरोना काळात या बँक ग्राहकांना मोठा झटका! Cash withdrawal नियमात मोठा बदल)ताज्या आकडेवारीनुसार, जुलै 2020 मध्ये ईएसआयसी योजनेत सामील झालेल्या सदस्यांची एकूण संख्या 7.63 लाख होती. ऑगस्टमध्ये 9.5 लाख, सप्टेंबरमध्ये 11.58 लाख आणि ऑक्टोबर 2020 मध्ये 12.11 लाखपर्यंत पोहचली. नोव्हेंबरमध्ये ही संख्या घटली आणि 9.56 लाखांवर गेली. डिसेंबर 2020 मध्ये ईएसआयसी योजनेच्या एकूण सभासदांची संख्या 12.30 लाख झाली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर आता लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एनएसओच्या अहवालानुसार 2019-20 मध्ये ईएसआयसी योजनांच्या मेंदर्सची संख्या 1.51 कोटी होती जी सन 2018-19 मध्ये 1.49 कोटी होती. सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 दरम्यान, ईएसआयसी योजनेत सुमारे 83.35 लाख नवीन मेंबर्स सहभागी झाले होते. सप्टेंबर 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत ईएसआयसीमध्ये सहभागी होणाऱ् मेंबर्सची संख्या 4.86 कोटी होती. एनएसओ अहवाल नवीन ग्राहकांच्या ईएसआयसी, ईपीएफओ आणि पीएफआरडीएच्या योजनांशी संबंधित डेटावर आधारित आहे. हे वाचा - WhatsApp वर आलेल्या लिंकद्वारे तुम्हीही Pink व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड केलं का?) फेब्रुवारीमध्ये ईपीएफओमध्ये 12.37 लाख नवीन मेंबर्स जोडले गेलेत. तुलनात्मकरित्या जानेवारी 2021 च्या 11.95 लाख सभासदांपेक्षा अधिक आहे. सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान एकूण 4.11 कोटी नवीन ग्राहक ईपीएफओ योजनेत जोडले गेले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Economy, Job, Lockdown, Money

    पुढील बातम्या