जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कोरोना काळात या बँक ग्राहकांना मोठा झटका! Cash withdrawal नियमात मोठा बदल

कोरोना काळात या बँक ग्राहकांना मोठा झटका! Cash withdrawal नियमात मोठा बदल

Saving Account मधून पैसे काढणं महागलं

Saving Account मधून पैसे काढणं महागलं

कोरोना काळात पैशांची गरज भासते आहे आणि आता त्यात आता बँकेने बदलेले हे नियम 1 मे 2021 पासून लागू होतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 एप्रिल : सध्या कोरोना काळात अनेकांना पैशांची गरज पडते आहे. अशावेळी बँकेत जमा केलेले पैसे काढले जात आहेत. दरम्यान आता एका मोठ्या बँकेने अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. एक्सिस बँकेमधून पैसे काढणं महाग झाले आहे. बँकेने बचत खात्यामधून कॅश काढणे (cash withdrawal) आणि एसएमएस (SMS) शुल्क वाढवलं आहे. बँकेचे बदललेले नवीन नियम 1 मे 2021 पासून लागू होतील. 1 मे 2021 पासून अ‍ॅक्सिस बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यात सरासरी किमान मासिक 15,000 रुपये बॅलन्स (Account Balance) ठेवावे लागतील. सध्या ही मर्यादा 10,000 रुपये आहे. याशिवाय बँकेने प्राइम आणि लिबर्टी बचत खात्यात सरासरी किमान बॅलन्स मर्यादा (Balance limit)  15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. हे वाचा -  या Mutual Fund मध्ये गुंतवलेली रक्कम 5 वर्षांत दुप्पट तर 10 वर्षांत झाली तिप्पट **)** अ‍ॅक्सिस बँक आपल्या बचत खाते (Saving Account) धारकांना 1 महिन्यात 4 ट्रान्झॅक्शन (Transaction) किंवा 2 लाख रुपये विनामूल्य काढण्यास परवानगी देते. यानंतर रोख रक्कम काढल्यावर प्रति 5 हजार रुपयांवर जास्तीत जास्त 150 रुपये चार्जेस घेते. आता बँकेने फ्री ट्रान्झॅक्शन (Bank Free Transactions) नंतर लागणाऱे चार्जेस 5 रूपयांवरून 10 रुपये केले आहेत. तर, जास्तीत जास्त 150 रुपये चार्जेस कायम ठेवण्यात आले आहेत. अकाऊंटमध्ये मिनीमम बॅलन्स नसेल तर 50 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत चार्जेस आकारले जातील. हे वाचा -  सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; 2 महिन्यात 4 हजारानं झालं महाग, तपासा आजचे दर ) याशिवाय आता एक्सिस बँकेकडून प्रति एसएमएसवर 25 पैसे आकारले जाणार आहेत. सध्या दरमहा 5 रुपये एसएसएस चार्जेस आहे. हे नवीन दर 1 जुलै 2021 पासून लागू होतील. ओटीपी आणि बँकेने पाठवलेल्या प्रमोशनल एसएमएसवर चार्जेस नसतील. सॅलरी अकाऊंटच्या नियमात बदल अ‍ॅक्सिस बँकेने सॅलरी अकाऊंटचे नियमही बदलले आहेत. जर सॅलरी अकाऊंट 6 महिन्यांपेक्षा जास्त जुनं आहे आणि कोणत्याही 1 महिन्यात पगार क्रेडिट नसेल तर दर महिना 100 रुपये शुल्क आकारलं जाईल. त्याबरोबर जर आपल्या खात्यात 17 महिन्यांपर्यंत ट्रान्झॅक्शन झालं नसेल तर 18 व्या महिन्यात 100 रुपये शुल्क आकारले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात