मराठी बातम्या /बातम्या /मनी /New IPOs: एक-दोन नव्हे तर 7 आयपीओ येणार बाजारात! Policybazaar-Paytm सह मिळेल कमाईची सुवर्णसंधी

New IPOs: एक-दोन नव्हे तर 7 आयपीओ येणार बाजारात! Policybazaar-Paytm सह मिळेल कमाईची सुवर्णसंधी

New IPO: सणासुदीचा काळ म्हणजे शॉपिंगचा काळ असतो. मात्र या काळात तुम्ही एखादी गुंतवणूक करून चांगला नफा देखील मिळवू शकता. काहीच दिवसात बाजारात एक-दोन नव्हे तर सात आयपीओंची रांग लागणार आहे.

New IPO: सणासुदीचा काळ म्हणजे शॉपिंगचा काळ असतो. मात्र या काळात तुम्ही एखादी गुंतवणूक करून चांगला नफा देखील मिळवू शकता. काहीच दिवसात बाजारात एक-दोन नव्हे तर सात आयपीओंची रांग लागणार आहे.

New IPO: सणासुदीचा काळ म्हणजे शॉपिंगचा काळ असतो. मात्र या काळात तुम्ही एखादी गुंतवणूक करून चांगला नफा देखील मिळवू शकता. काहीच दिवसात बाजारात एक-दोन नव्हे तर सात आयपीओंची रांग लागणार आहे.

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर: सणासुदीचा काळ म्हणजे शॉपिंगचा काळ असतो. मात्र या काळात तुम्ही एखादी गुंतवणूक करून चांगला नफा देखील मिळवू शकता. काहीच दिवसात बाजारात एक-दोन नव्हे तर सात आयपीओंची (Upcoming IPO List)  रांग लागणार आहे. हे अर्धा डझनपेक्षा जास्त आयपीओ तुम्हाला चांगला नफा मिळवून देतील. बाजार नियामक सेबीने (SEBI approved IPO) पॉलिसी बाझार  (Policybazaar IPO) आणि पेटीएम (Paytm IPO) सह विविध कंपन्यांच्या 28000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या आयपीओंना मंजुरी दिली आहे. जुलै-ऑगस्ट दरम्यान या कंपन्यांनी आयपीओसाठी पेपर दाखल केले होते आणि त्यांना 18-22 ऑक्टोबरदरम्यान सेबीकडून मंजुरी मिळाली आहे.

ज्या कंपन्यांना SEBI कडून IPO साठी मंजुरी मिळाली आहे त्यात  ईएसएएफ स्माल फायनान्स बँक (ESAF Small Finance Bank IPO), सफायर फूड्स इंडिया (Sapphire Foods India IPO) आणि आनंद राठी वेल्थ  (Anand Rathi Wealth IPO) यांचा समावेश आहे. याशिवाय पैसाबाझार (Paisabazaar IPO), पीबी फिनटेक (PB Fintech IPO), लाइफ सायन्स कंपनी टार्सन्स प्रॉडक्ट्स (Tarsons Products IPO) आणि एचपी अॅडेसिव्ह्सनाही आयपीओसाठी (HP Adhesives IPO) मंजुरी मिळाली आहे. या कंपन्यांचे शेअर्सही बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील.

हे वाचा-Diwali Picks: शेअरखानची टॉप पिक्स, दिवाळीनंतर होऊ शकते बंपर कमाई

SBF IPO मधून जमा झालेला पैसा कुठे वापरला जाईल?

स्मॉल फायनान्स बँक (SFB) 997.78 कोटी रुपयांच्या IPO अंतर्गत 800 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करेल. तर ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत 197.78 कोटी रुपयांचे शेअर्स विकले जातील. नवीन शेअर्स जारी करून जमा केलेला पैसा टियर-1 भांडवल उभारण्यासाठी वापरला जाईल. याद्वारे कंपनीच्या भविष्यातील गरजा पूर्ण करता येतील. OFS अंतर्गत, PNB MetLife, Bajaj Allianz Life, PI Ventures आणि John Chakola त्यांचे स्टेक कमी करतील.

SFI IPO अंतर्गत कोणतेही नवीन शेअर जारी केले जाणार नाहीत

केएफसी आणि पिझ्झा हट सारखे आउटलेट्स चालवणारी Sapphire Foods India इश्यू करत असलेल्या IPO मधून रु. 1500-2000 कोटी उभारण्याची योजना आखत आहे. कंपनी IPO अंतर्गत कोणतेही नवीन शेअर्स जारी करणार नाही. शेअरहोल्डर्स QSR मॅनेजमेंट ट्रस्ट, सॅफायर फूड्स मॉरिशस, WWD रुबी, अॅमेथिस्ट, AAGV इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, एडलवाईस क्रॉसओव्हर अपॉर्च्युनिटीज फंड आणि एडलवाईस क्रॉसओव्हर अपॉर्च्युनिटीज फंड - सीरीज 2 ओएफएसअंतर्गत 1,75,69,941 इक्विटी शेअर्स विकतील.

हे वाचा-भारतातील पहिला 'स्किल इम्पॅक्ट बॉण्ड' लॉन्च; 50 हजार तरुणांना होणार फायदा

ARW IPO पूर्णपणे असेल ऑफर फॉर सेल

आनंद राठी वेल्थ आयपीओद्वारे 1,000 कोटी रुपये उभारण्याची योजना करत आहे. हा IPO पूर्णपणे OFS आहे. या अंतर्गत प्रमोटर्स आणि विद्यमान भागधारक 1.2 कोटी इक्विटी शेअर्सची विक्री करतील. OFS अंतर्गत, आनंद राठी फायनान्शिअल सर्व्हिसेस, आनंद राठी, प्रदीप गुप्ता, अमित राठी, प्रीती गुप्ता, सुप्रिया राठी, रावल फॅमिली ट्रस्ट, जुगल मंत्री आणि फिरोज अझीझ त्यांचे स्टेक कमी करतील.

पेटीएम आयपीओमध्येही जारी होणार फ्रेश शेअर्स

पेटीएम आयपीओ अंतर्गत नवीन इक्विटी शेअर्स जारी करून 8,300 कोटी रुपये उभारेल. त्याच वेळी, OFS अंतर्गत 8300 कोटी रुपयांचे शेअर्स जारी केले जातील. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्याशिवाय अलीबाबा ग्रुपच्या कंपन्या OFS अंतर्गत त्यांचे स्टेक विकतील.

First published:

Tags: Investment, Money, Savings and investments