मराठी बातम्या /बातम्या /मनी /

भारतातील पहिला 'स्किल इम्पॅक्ट बॉण्ड' लॉन्च; 50 हजार तरुणांना होणार फायदा

भारतातील पहिला 'स्किल इम्पॅक्ट बॉण्ड' लॉन्च; 50 हजार तरुणांना होणार फायदा

National Skill Development Corporation ने मंगळवारी जागतिक भागीदारांच्या सहकार्याने भारतात कौशल्यासाठी आपल्या प्रमाणे पहिले 'इम्पॅक्ट बाँड' लाँच केले आहे. यामध्ये 14.4 दशलक्ष मिलियन डॉलरचा निधीचाही समावेश आहे

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 26 ऑक्टोबर : नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (National Skill Development Corporation) ने मंगळवारी जागतिक भागीदारांच्या सहकार्याने भारतात कौशल्यासाठी आपल्या प्रमाणे पहिले 'इम्पॅक्ट बाँड' लाँच केले आहे. यामध्ये 14.4 दशलक्ष मिलियन डॉलरचा निधीचाही समावेश आहे, ज्याचा फायदा 50,000 तरुणांना रोजगाराद्वारे होईल.

NSDC सोबत त्यात HRH प्रिन्स चार्ल्सचा ब्रिटिश एशियन ट्रस्ट, मायकेल अँड सुसान डेल फाउंडेशन (MSDF), चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन, HSBC इंडिया, JSW फाउंडेशन आणि USAID यांचा टेक्निकल भागीदार म्हणून समावेश आहे. स्किल इम्पॅक्ट बाँड (SIB) हा सार्वजनिक, खाजगी भागीदार आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी संस्था NSDC यांचा समावेश असलेला पहिला प्रभावी बाँड आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.

NSDC आणि MSDF हे जास्त जोखीम असलेले गुंतवणूकदार आहेत ज्यांनी सर्विस कंपनीला चार वर्षांच्या प्रभाव बाँडच्या आजीवन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी 4 दशलक्ष डॉलर देण्याचे वचन दिले आहे. यामुळे पुढील चार वर्षांत भारतातील 50,000 तरुणांना फायदा होईल असा अंदाज आहे, ज्यामध्ये 14.4 दशलक्ष डॉलरचा निधी आहे.

Top Gainer & looser : सेंसेक्समध्ये 383 अंकाची वाढ, TATA चे शेअर्स 4 टक्क्यांनी वधारले

स्किल इम्पॅक्ट बाँडमध्ये महिला आणि मुलींसाठी 60 टक्के लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. महिला आणि मुलींना जास्तीत जास्त व्यावसायिक स्तरावर प्रशिक्षित करणे आणि किरकोळ बाजार, पोशाख, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये त्यांची पोहोच वाढवणे हा त्याचा उद्देश आहे.

LIC Policy : 1302 रुपये भरुन मिळवा 27.60 लाख रुपये, वाचा पॉलिसीबद्दल संपूर्ण माहिती

एनएसडीसीचे अध्यक्ष ए.एम. नाईक म्हणाले की, या प्रकल्पामध्ये विशेषतः महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. स्किल इम्पॅक्ट बाँड हा भारतातील कौशल्य सुधारण्यासाठी NSDC आणि प्रतिष्ठित जागतिक संस्था आणि संघटना यांच्यातील एक प्रयत्न आहे. युवा रोजगार संकट कमी करणे आणि विशेषत: महिलांना विविध क्षेत्रात प्रशिक्षित करणे आहे हा उद्देश असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

First published:

Tags: Central government, Money, जॉब