मुंबई, 4 फेब्रुवारी : मागील 2021 हे वर्ष IPOs ने गाजवल्यानंतर आता यावर्षी IPO विविध कंपन्या आपले आणण्यास सुरुवात करत आहेत. बेअरिंग केज बनवणारी कंपनी हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलने (Harsha Engineers International) त्यांच्या IPO च्या मंजुरीसाठी SEBI कडे अर्ज दाखल केला आहे. कंपनी या IPO च्या माध्यमातून 755 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. IPO मध्ये 455 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असेल तर विद्यमान भागधारक ऑफर फॉर सेल भाग अंतर्गत 300 कोटी रुपयांचे शेअर्स विकतील. ऑफर फॉर सेलमध्ये, राजेंद्र शाह 66.75 कोटी रुपयांपर्यंत, हरीश रंगवाला 75 कोटी रुपयांपर्यंत, टिळक शाह 16.50 कोटी रुपयांपर्यंत, चारुशीला रंगवाला 75 कोटी रुपयांपर्यंत आणि निर्मला शाह 66.75 कोटी रुपयांपर्यंत शेअर विकतील. या ऑफरमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळा हिस्सा राखून ठेवला जाईल. रिझर्व्ह बँकेकडून ‘या’ बँकेचा परवाना रद्द, खातेधारकांवर काय परिणाम होणार? चेक करा या IPO च्या उत्पन्नापैकी 270 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी, 77.95 कोटी रुपये कंपनीने केलेल्या मशिनरी खरेदीसाठी, 7.12 कोटी रुपये पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आणि विद्यमान युनिट्सच्या नूतनीकरणासाठी तसेच कंपनीसाठी सामान्य ऑपरेशनमध्ये वापरले जातील. Tata Group च्या ‘या’ शेअरला ब्रोकरेज फर्मची BUY रेटिंग, Rakesh Jhunjhunwala यांनीही स्टेक वाढवले अहमदाबादस्थित कंपनीचा आयपीओचा हा दुसरा प्रयत्न आहे. याआधी ऑगस्ट 2018 मध्ये कंपनीने SEBI कडे IPO साठी अर्जही दाखल केला होता. कंपनीचे 5 उत्पादन युनिट आहेत. त्याचे गुजरातमध्ये 3 उत्पादन युनिट, चीनमध्ये 1 उत्पादन युनिट आणि रोमानियामध्ये 1 युनिट आहे. Axis Capital, Equirus Capital आणि JM Financial हे या IPO चे बुकरनिंग लीड मॅनेजर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.