छोट्या मुलांचा जाडेपणा कमी करण्यासाठी FSSAIनं घेतला 'हा' निर्णय

छोट्या मुलांचा जाडेपणा कमी करण्यासाठी  FSSAIनं घेतला 'हा' निर्णय

जंक फूड आणि साॅफ्ट ड्रिंकचा जास्त वापर केल्यानं मुलं जाडी होतातच, शिवाय इतर गंभीर आजारांनाही तोंड द्यावं लागतं.

  • Share this:

मुंबई, 14 जून : लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI )चे सीईओ मयंक अग्रवाल यांनी जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर विचार केलाय. स्कूल हेल्थकेअरवर झालेल्या एसोचॅमच्या संमेलनात हे सांगितलं. जंक फूड आणि साॅफ्ट ड्रिंकचा जास्त वापर केल्यानं मुलं जाडी होतातच, शिवाय इतर गंभीर आजारांनाही तोंड द्यावं लागतं. खाण्याच्या या संस्कृतीमुळेच छोट्यांमध्ये डायबेटिस आणि हृदय रोगाचं प्रमाण वाढतंय. आरोग्य तज्ज्ञांच्या मते हे असंच राहिलं तर 2030पर्यंत प्रत्येक तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती जाडा असेल.

मुलांच्या आरोग्याचा विचार करता राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम 2013 आणलं गेलं होतं. त्यानुसार मुलांच्या खाण्या-पिण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे.  सध्या फास्ट फूड कल्चर वाढलंय. त्यात पिझा, बर्गर, चिप्स, गोड कार्बोनेटेड पेय, रेडी टु इट नुडल्स हे पदार्थ शाळांबाहेरही विकले जातात. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अनुसार शाळांच्या 50 मीटर क्षेत्रात या खाद्य पदार्थांच्या जाहिरातींवर आणि विक्रीवर बंदी घातली जाईल.

कोणी जबरदस्तीनं Aadhaar नंबर मागितला तर जावं लागेल तुरुंगात

खासगी क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी सरकारी नोकरी उपलब्ध, 'इथे' आहेत संधी

एफएसएसएआयनं म्हटलं होतं की त्यांचा उद्देश्य पिझा, बर्गर, चिप्स, गोड कार्बोनेटेड पेय, रेडी टु इट नुडल्स इत्यादी पदार्थांच्या विक्री आणि उपलब्धतेला मर्यादित ठेवायचं. संमेलनला संबोधित करताना अग्रवाल म्हणाले की, 10 मधून 6 रोग चुकीच्या आहारामुळे होतात. त्यासाठी आरोग्यपूर्ण आहार घ्यावा लागतो.

ई वाॅलेटमध्ये मित्रानं पैसे ट्रान्सफर केले तर कर लागतो का?

त्यांनी सांगितलं की, आपण आरोग्यपूर्ण आहार घेतला तर आजार होत नाहीत. त्यांनी शाळांमध्ये सुरक्षित, पौष्टिक आणि संपूर्ण आहाराला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं सांगितलं.

VIDEO : रुग्णालयात बाळाची काळजी घ्या, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद!

First published: June 14, 2019, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading