ई वाॅलेटमध्ये मित्रानं पैसे ट्रान्सफर केले तर कर लागतो का?

ई वाॅलेटमध्ये मित्रानं पैसे ट्रान्सफर केले तर कर लागतो का?

तुम्ही याचा कधी विचार केलाय का की डिजिटल ट्रॅन्झॅक्शनच्या वेळी तुम्हाला कर लागतो की नाही? लागत असेल तर किती?

  • Share this:

मुंबई, 14 जून : डिजिटल इंडियाच्या युगात आपण डिजिटल किंवा ऑनलाइन वाॅलेटचा उपयोग करतो. हल्ली अनेक अ‍ॅप्स निघालेत जी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनच्या सुविधा देतात. आता कुठेही पेमेंट करायचं असेल, मित्राला पैसे द्यायचे असतील, कुणाकडून पैसे घ्यायचे असतील तर ऑनलाइन पेमेंट अ‍ॅप्सचा जास्त उपयोग केला जातो.

तुम्ही याचा कधी विचार केलाय का की या ट्रॅन्झॅक्शनच्या वेळी तुम्हाला कर लागतो की नाही? लागत असेल तर किती? समजा तुम्ही तुमच्या ई वाॅलेटमध्ये तुमच्या एखाद्या मित्रानं पैसे ट्रान्सफर केले तर तुम्हाला माहीत आहे का की किती कर लागतो ते? की लागतच नाही?

घर खरेदी करणाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकतं मोठा दिलासा

12 वी उत्तीर्ण असलेल्यांना भारतीय नौदलात संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज

फोनमध्ये ई वाॅलेट्स किंवा युपीएद्वारे पैसे पाठवणं किंवा रिसिव्ह करणं खूप सोपं आहे. समजा तुमच्या एका मित्रानं राहिलेली उधारी चुकवली, तर त्यावर कर लागणार की नाही हे पैसे किती आहेत त्यावर अवलंबून असतं.

ट्रॅन्झॅक्शन किंवा रिसिट्स गिफ्टच्या रूपात हे दिलं जातं. अशा गिफ्टसची किंमत 50 हजार रुपयापर्यंत आहे तर त्यावर कसलाच कर लागणार नाही. पण मोठ्या रकमेचं ट्रॅन्झॅक्शन झालं तर पूर्ण रक्कमेवर कर लागू शकतो.

घर खरेदी करणाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकतं मोठा दिलासा

तुमच्या ई वाॅलेट किंवा सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये आलेल्या या रिसिट्स या तुम्ही दिलेलं कर्ज फेडण्यासाठी असेल तर त्यावर कुठलाच कर लागणार नाही. आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं याबद्दल विचारलंच तर तुम्ही कर्ज असल्याचं सिद्ध करू शकता.

त्यामुळे हल्ली ई वाॅलेटचा उपयोग जास्त केला जातो. तो सोयीस्करही आहे. यामुळे पैशाची देवाणघेवाण सोपी होऊन जाते.

VIDEO : व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची उदयनराजेंकडून नक्कल, दाखवला आपला मोबाईल!

First published: June 14, 2019, 5:13 PM IST
Tags: e wallet

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading