News18 Lokmat

MI vs CSK : ...म्हणून नीता अंबानी आणि रितीका यांनी पाहिला नाही मुंबईच्या विजयाचा ‘तो’ क्षण

या कारणामुळं रितीका आणि नीता यांनी मुंबईच्या विजयाकडे फिरवली होती पाठ.

News18 Lokmat | Updated On: May 13, 2019 05:12 PM IST

MI vs CSK : ...म्हणून नीता अंबानी आणि रितीका यांनी पाहिला नाही मुंबईच्या विजयाचा ‘तो’ क्षण

मुंबई, 13 मे : चेन्नईला पराभूत करून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. मुंबईचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने टाकलेल्या शेवटच्या षटकात मुंबईने एका धावेनं विजय साजरा केला. मुंबईने दिलेलं 150 धावांचं आव्हान चेन्नई सहज पूर्ण करेल असं वाटत होतं. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने सामन्यावर पकड मिळवली. धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईचे दोन फलंदाज लागोपाठ बाद झाले. शेवटच्या षटकात लसिथ मलिंगाने टिच्चून गोलंदाजी केली. याच षटकात शेन वॉटसन धावबाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला बाद करत मलिंगाने मुंबईला विजय मिळवून दिला. याबरोबरच मुंबईनं इतिहास घडवला आणि सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं.

या विजयात सगळे सहभागी झाले होते. मात्र, पहिल्या हंगामापासून प्रत्येक सामन्यात आपल्या संघासोबत असणाऱ्या संघामालक नीता अंबानी यांना मुंबईच्या विजयाचा तो शेवटचा क्षण पाहता आला नाही. चेन्नई आणि मुंबई यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर झालेला सामना पाहण्यासाठी निता अंबानी आणि आकाश अंबी मैदानावर हजर होते. मात्र निता यांनी मुंबईच्या विजयाचा तो क्षण पाहिला नाही. मात्र याबाबत नीता यांनी स्वत: स्पष्टिकरण दिले आहे.

मुंबईनं दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सामना जिंकेल असं वाटत असताना, शेवटच्या एका चेंडूत 2 धावांची गरज होती. त्यामुळं हा सामना चांगलाच रोमांचक झाला होता. त्यामुळं हा रोमांच पाहण्याची माझी हिम्मत नव्हती, असे सांगितले. मात्र सामना जिंकल्यानंतर त्यांनी आपल्या संघासा शुभेच्छा दिल्या.

रोहितच्या पत्नीनं तर सामन्याकडे फिरवली पाठ

मुंबई आणि चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यात एवढा रोमांच होता की चाहत्यांच्याही अंगावर काटे आले होते. असाच काहीसा प्रसंग रोहितची पत्नी रितीका सजदेह हिच्यावर ओढावला. रितीकानं तर चक्क पाठ फिरवून डोळे बंद करुन उभी होती. त्यामुळं निता अंबानी यांच्याबरोबरच तिनंही मुंबईच्या विजयाचा तो क्षण पाहिला नाही.

Loading...

वाचा- MI vs CSK : फायनलमध्ये 'तू-तू, मैं-मैं', धोनीनं केला मोठा खुलासा

वाचा- पंचांसमोर अॅटिट्यूड दाखवणं पोलार्डच्या अंगलट, बर्थ डेला मिळालं शिक्षेचं गिफ्ट


निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2019 03:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...