'यामुळे' ट्रेनच्या तिकिटांना द्यावे लागतायत विमानापेक्षा जास्त पैसे

तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जायचा प्लॅन अगोदर केला नसेल तर तुम्हाला ते महाग पडेल.

News18 Lokmat | Updated On: May 13, 2019 04:05 PM IST

'यामुळे' ट्रेनच्या तिकिटांना द्यावे लागतायत विमानापेक्षा जास्त पैसे

मुंबई, 13 मे : तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जायचा प्लॅन अगोदर केला नसेल तर तुम्हाला ते महाग पडेल. रेल्वे आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच जादा गाड्या सोडत असते. तरीही आता रेल्वे तिकिटांचे दर खूप वाढलेत. ट्रेनचं तिकीट विमानाच्या तिकिटापेक्षा महाग झालंय. मुंबई-दिल्ली राजधानीच्या एसी फर्स्ट क्लास तिकीट तीन आठवडे अगोदर काढलं तरी महाग पडतंय. ते विमानाच्या तिकिटापेक्षा महाग आहे.

LIC पाॅलिसी पसंत नाही? 'अशा' प्रकारे तुम्ही पैसे परत घेऊ शकता

28 मेच्या सुविधा एक्सप्रेससाठी गोरखपूर ते मुंबई हे तिकीट काढण्यासाठी एक व्यक्ती गेला होता. त्यावेळी त्याला कळलं की एसी सेकंड टायरसाठी प्रत्येक व्यक्तीला. 6,610 रुपये पडतायत. मग त्यानं विमानाचं तिकीट काढलं, तेव्हा 4 जणांची तिकिटं त्याला रेल्वेपेक्षा 1 हजार रुपयांनी स्वस्त पडलीत.

LIC पाॅलिसी पसंत नाही? 'अशा' प्रकारे तुम्ही पैसे परत घेऊ शकता

एअर इंडियाच्या अध्यक्षा अश्विनी लोहानींच्या मते विमानाचं तिकीट राजधानी एक्सप्रेसच्या एसी फर्स्ट क्लासच्या भाड्याच्या जवळपास आहे. याचा ग्राहकांना चांगला फायदा मिळतोय.

Loading...

SBI चं खास सेव्हिंग अकाउंट उघडलंत तर मिळतील 'या' सुविधा

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रविंदर भाकर यांच्या मते मूळ दरासोबत तत्कालचा दर जोडलेला असतो. प्रीमियम तत्काळ घेतल्यावर तिकिटांची किंमत वाढते. सुविधा ट्रेनची किंमत डायनॅमिक असते.

त्यामुळे तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल तर त्याचं बुकिंग अगोदर करा. म्हणजे तिकिटांचे अव्वाच्या सव्वा पैसे द्यावे लागणार नाहीत.


निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2019 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...