मराठी बातम्या /बातम्या /मनी /Business Idea: या व्यवसायासाठी सरकार करेल मदत; महिन्याला लाखोंची कमाई शक्य

Business Idea: या व्यवसायासाठी सरकार करेल मदत; महिन्याला लाखोंची कमाई शक्य

New Business idea: यासाठीची यंत्र खरेदी करायला 4.40 लाख रुपये खर्च येईल. वर्षाला किमान 5 लाख म्हणजे महिन्याला 42 हजार रुपयांचा नफा तुमच्या हातात पडेल.

New Business idea: यासाठीची यंत्र खरेदी करायला 4.40 लाख रुपये खर्च येईल. वर्षाला किमान 5 लाख म्हणजे महिन्याला 42 हजार रुपयांचा नफा तुमच्या हातात पडेल.

New Business idea: यासाठीची यंत्र खरेदी करायला 4.40 लाख रुपये खर्च येईल. वर्षाला किमान 5 लाख म्हणजे महिन्याला 42 हजार रुपयांचा नफा तुमच्या हातात पडेल.

  नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: कोविडकाळामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांना व्यवसायही बंद करावे लागले आहेत. पण आता कोविड महामारीचं रूप सौम्य झालं आहे त्यामुळे सगळे नव्या उमेदीने कामाला लागले आहेत. अनेकांना नोकरीपेक्षा धंदाच चांगला वाटू लागला आहे. तुम्हीही जर व्यवसाय करण्याच्या (Starting own business) विचारात असाल तर आम्ही तुम्हाला एक व्यवसाय सुचवणार आहोत.

  पेपर नॅपकिन्सचा व्यवसाय (Paper Napkins Business) तुम्ही करू शकता. या व्यवसायासाठी सरकार मदतही करतं. पेपर नॅपकिनचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी किती खर्च येतो आणि त्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई कशी करू शकता याबद्दल जाणून घेऊया.

  सध्या पेपर नॅपकिन म्हणजे टिश्यु पेपरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑफिस, हॉटेल, रेस्टॉरंट्स इथं सगळीकडे टिश्यु पेपर मोठ्या प्रमाणात वापरला जातो. सध्या केटरिंग सेवा पुरवणाऱ्यांना उद्योजकांनाही मोठ्या प्रमाणात टिश्यु पेपर हवा असतो. केवळ शहरांतच नव्हे तर खेड्यापाड्यांतील कार्यक्रमांतही टिश्यु पेपर लागतोच. म्हणजे एकूणात काय तर टिश्यु पेपरची मागणी खूप वाढली आहे. त्यामुळे व्यवसाय नक्की चालू शकतो.

  स्टेट बँक की पोस्ट ऑफिस? कुठे गुंतवणूक केल्यास मिळेल जास्त नफा?

  पेपर नॅपकिन मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी तुम्हाला 3.50 लाख रुपयांची तयारी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला बँकेत मुद्रा योजनेतून कर्जासाठी अर्ज करावा लागेल. या योजनेतून बँक तुम्हाला 3 लाख 10 हजार रुपये टर्म लोन आणि खेळतं भांडवल म्हणून कॅपिटल लोन 5 लाख 30 हजार रुपये देऊ शकेल. तुम्ही वर्षात 1.50 लाख किलोग्रॅम पेपर नॅपकिनचं उत्पादन करू शकता. 65 रुपये किलो दराने ही नॅपकिन विकली जातात. त्यामुळे तुम्हाचा वर्षाचा टर्न ओव्हर सुमारे 97.50 लाख रुपयांचा होईल.

  यासाठीची यंत्र खरेदी करायला 4.40 लाख रुपये खर्च येईल. यात 4 लाख रुपयांचं यंत्र आणि इतर कर व विमा मिळून 40 हजार रुपयांचा खर्च होईल. दरमहा कच्चा माल 7.13 लाख रुपयांचा लागेल. 21 जीएसएमचा टिश्यु पेपर सुमारे 12.5 टन लागेल तो 7 लाखांना पडतो. शाई आणि कंझ्युमेबलसाठी 10 हजार, पॅकिंगचा खर्च 3 हजार रुपये, नोकरांचा पगार दरमहा 27 हजार 600 रुपये इतर खर्च 13 हजार 500 रुपये येईल. वीजेसाठी 2500, वाहतुकीला 3 हजार रुपये, कंझ्युमेबल 1 हजार, फोन, स्टेशनरी, रखरखाव याला 3 हजार रुपये लागतील. यातून लक्षात येतं की खेळतं भांडवल 7 लाख 54 हजार रुपये लागेल. एकूण गुंतवणूक 11 लाख 94 हजार रुपयांची होईल.

  सरकारी बँकेसाठी 'बँक मित्र' म्हणून काम करा, दरमाह मिळवा 5000 रुपये

  वर्षात 1.50 लाख किलो पेपर नॅपकिनचं उत्पादन करून ते 65 रुपये किलोने विकलं तर 97 लाख 50 हजार रुपयांचा टर्न ओव्हर होऊ शकेल. सगळे खर्च मिळून वर्षाला 92 लाख 50 हजार लागतील. वर्षाला 5 लाख म्हणजे महिन्याला 42 हजार रुपयांचा नफा तुमच्या हातात पडेल.

  ही माहिती तुम्हाला पटली असेल आणि तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत या व्यवसायासाठी कर्ज मिळावं म्हणून अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला अर्जात नाव पत्ता, व्यवसायाच्या ठिकाणचा पत्ता व इतर माहिती द्यावी लागेल. इथं तुम्हाला प्रोसेसिंग किंवा गॅरंटी फी द्यावी लागणार नाही. कर्ज तुम्ही हप्त्यांत फेडू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Business, Small investment business, Startup