मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सरकारी बँकेसाठी 'बँक मित्र' म्हणून काम करा, दरमाह मिळवा 5000 रुपये; कसा कराल अर्ज?

सरकारी बँकेसाठी 'बँक मित्र' म्हणून काम करा, दरमाह मिळवा 5000 रुपये; कसा कराल अर्ज?

बँक मित्राला कोणत्याही व्यक्तीचे खाते उघडणे, पैसे जमा करणे, पैसे काढणे, त्याचे क्रेडिट कार्ड आणि बिल भरणे यासाठी कमिशन दिले जाते. प्रधानमंत्री जन धन योजना (PM Jan Dhan Yojna) अंतर्गत सर्व बँक मित्रांना 1.25 लाख रुपयांचे कर्ज देखील दिले जाते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 नोव्हेंबर : कोरोनामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. अशात नवी नोकरी मिळणे थोडं कठीण बनलं आहेत. त्यामुळे दर महिन्याला निश्चित उत्पन्न हवे असल्यास 'बँक मित्र' एक उत्तम पर्याय ठरु शकतो. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँक मित्रासाठी अर्ज मागवत असते. मात्र हे बँक मित्र नेमकं करतात काय, त्याचं काम काय याबद्दल माहिती जाणून घेऊया. दरमहा 5000 रुपयांपर्यंत कमाई बँक मित्र बनून, तुम्ही अनेक मार्गांनी कमाई करू शकता. बँक मित्राला कोणत्याही व्यक्तीचे खाते उघडणे, पैसे जमा करणे, पैसे काढणे, त्याचे क्रेडिट कार्ड आणि बिल भरणे यासाठी कमिशन दिले जाते. प्रधानमंत्री जन धन योजना (PM Jan Dhan Yojna) अंतर्गत सर्व बँक मित्रांना 1.25 लाख रुपयांचे कर्ज देखील दिले जाते. त्यापैकी 50,000 रुपये वस्तूंसाठी, 25,000 रुपये कामासाठी आणि 50,000 रुपये वाहनासाठी दिले जातात. याशिवाय बँक मित्राला दरमहा उत्पन्न म्हणून 2000 ते 5000 रुपये दिले जातात. PF वर किती मिळेल व्याज? या दिवशी EPFO च्या बैठकीत होणार निर्णय; वाचा सविस्तर कोण बनू शकतात बँक मित्र? जो व्यक्ती इतर लोकांना बँक खाते उघडण्यात, विमा काढण्यात, पैसे जमा करण्यात आणि बँकेच्या इतर कामांमध्ये मदत करतो त्याला बँक मित्र म्हणतात. बँक मित्र होण्यासाठी तुम्हाला सरकारसोबत काम करावे लागेल. विना इंटरनेट करा UPI पेमेंट, NPCI ची खास सुविधा; काय आहे प्रोसेस? ही कागदपत्रे असणे गरजेचं >> ओळख पुराव्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्राची प्रत. >> योग्यतेसाठी इयत्ता दहावीची गुणपत्रिका. >> व्यवसायिक पत्त्यासाठी वीज बिल, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा पासपोर्टची कॉपी. >> पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक पासबुकची कॉपी किंवा रद्द केलेला चेक.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Job alert

    पुढील बातम्या