मुंबई, 27 जून : पाणीपुरी हे अत्यंत लोकप्रिय फास्टफूड (Fast Food) आहे. देशात प्रत्येक कानाकोपऱ्यांना तुम्हाला पाणीपुरीची दुकानं सापडतील. पाणीपुरीची (Pan Puri) आंबट-तिखट चव अनेकांच्या चिभेचे चोचले पुरवते. पाणीपुरीची चव भारतातच नव्हे तर परदेशातील नागरिकांनाही भुरळ पाडते. मात्र या पाणीपुरीवर आता नेपाळने बंदी (Nepal Bans Pani Puri ) घातली आहे. नेपाळच्या काठमांडू येथे कॉलराचे रुग्ण वाढल्याने ललितपूर मेट्रोपॉलिटन सिटी (LMC) मध्ये पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आतापर्यंत येथे कॉलराचे 12 रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी शहरात पाणीपुरी विक्री व वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरीत वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कॉलराचे जीवाणू आढळून आल्याचा दावा शहर प्रशासनाकडून करण्यात आला. शहर पोलीस प्रमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गजबजलेल्या भागात आणि कॉरिडॉर भागात पाणीपुरीची विक्री बंद करण्यासाठी अंतर्गत तयारी करण्यात आली असून, त्यामुळे खोऱ्यात कॉलरा पसरण्याचा धोका वाढला आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता, G7 देशांनी घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम होणार काठमांडू प्रशासनाच्या माहितीनुसार, काठमांडू खोऱ्यात आणखी सात जणांना कॉलराची लागण झाली असून, कॉलराच्या एकूण रुग्णांची संख्या आतापर्यंत 12 वर पोहोचली आहे. एपिडेमिओलॉजी आणि रोग नियंत्रण विभागाचे संचालक चुमनलाल दास यांच्या म्हणण्यानुसार, काठमांडू महानगरात कॉलराची पाच रुग्ण आणि चंद्रगिरी नगरपालिका आणि बुधानीलकंठा नगरपालिकेत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. नवीन लेबर कोडचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल; पगार कमी होणार की वाढणार? कॉलरा बाधितांवर उपचार सुरू आहेत. यापूर्वी राजधानीच्या विविध भागात कॉलराचे पाच रुग्ण आढळून आले होते. बाधितांपैकी दोघांवर आधीच उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाने लोकांना कॉलराची लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: उन्हाळा आणि पावसाळ्यात अतिसार, कॉलरा आणि इतर जलजन्य रोगांचा प्रसार होत असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याची विनंती मंत्रालयाने केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.