नवी दिल्ली, 26 जून : केंद्र सरकार चार नवीन लेबर कोड (New Labor Code) लागू करण्याच्या तयारीत आहे. सध्या देशातील 23 राज्यांनी लेबर कोडच्या नवीन तरतुदी स्वीकारल्या आहेत. जर हे चार लेबर कोड देशात लागू केले गेले तर त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार (Salary), कामाचे तास, वार्षिक रजा आणि फायनल सेटलमेंट यामध्ये बरेच बदल होतील. नवीन कामगार कायदे लागू झाल्याने देशात जिथे गुंतवणूक वाढेल, तिथे रोजगार निर्मितीही अधिक होईल, असा सरकारचा विश्वास आहे.
सरकारचे म्हणणे आहे की नवीन कामगार कायदा लागू करण्यामागे कामगारांची सामाजिक सुरक्षा यासह पेन्शन आणि ग्रॅच्युइटी, कामगार कल्याण, आरोग्य, सुरक्षा आणि कामाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करणे हा आहे. सरकारने अद्याप नवीन लेबर कोड लागू करण्याची तारीख जाहीर केली नसली तरी जुलै 2022 मध्ये ते लागू केले जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नवीन 4 लेबर कोड लागू झाल्यास पगार, सुट्ट्या, ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधीवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया.
आता नोकरी मागू नका तर द्या! छोट्या जागेत सुरू करा साबणाचा व्यवसाय, महिन्याला होईल बंपर कमाईपगारावर काय परिणाम होईल?
News18.com ने दिलेल्या वृत्तानुसार, नवीन श्रम संहितेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात मजुरीची पुनर्व्याख्या करण्यात आली आहे. यासह, कर्मचार्याचा टेक होम सॅलरी, म्हणजेच दरमहा त्याच्या बँक खात्यात येणारा पैसा आणि भविष्य निर्वाह निधीमध्ये जाणारा पैसा यावर मोठा परिणाम होईल. इंडस्लॉचे वैभव भारद्वाज सांगतात की, नवीन लेबर कोडचा केवळ पगारच नाही तर बोनस आणि ग्रॅच्युइटीवरही परिणाम होईल.
नव्या कामगार कायद्यात कामगारांचे मूळ वेतन एकूण पगाराच्या किमान 50 टक्के ठेवण्याची तरतूद केली जाऊ शकते. यामुळे भविष्य निर्वाह निधीमध्ये मालक आणि कर्मचारी यांचे योगदान वाढेल. पण यामुळे टेक होम सॅलरी कमी होईल. म्हणजेच दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पैसे येतील. नवीन कायद्यांनुसार निवृत्तीनंतर मिळणारी एकरकमी रक्कम आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे.
घराच्या गच्चीचा उपयोग करा बिझनेससाठी, घरबसल्या मिळवा चांगलं उत्पन्नदरवर्षीच्या सुट्ट्यांवर काय परिणाम होईल?
नव्या कामगार कायद्यात कर्मचाऱ्यांच्या सुट्याही तर्कसंगत करण्यात आल्या आहेत. नवीन कायद्यांनुसार, कर्मचारी दरवर्षी सुट्ट्यांच्या बदल्यात पैसे घेता येतील. आता कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर पडल्यानंतरच शिल्लक सुट्ट्यावर पैसे मिळतात.
वैभव भारद्वाज सांगतात की, कर्मचार्यांच्या दृष्टिकोनातून लक्षणीय बदल होत आहेत. आता ते कॅलेंडर वर्षाच्या शेवटी त्यांच्या सुट्ट्या रिडीम करू शकतील. कॅरी फॉरवर्डची मर्यादा ओलांडताच कर्मचाऱ्यांच्या रजा संपल्याचं आता घडतंय, यामुळे त्यांचे नुकसान होते.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.