सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता, G7 देशांनी घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम होणार
सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता, G7 देशांनी घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम होणार
रशियाचे उर्जेनंतरचे दुसरे सर्वात मोठे निर्यात उत्पादन आहे. 2020 मध्ये, रशियाने सुमारे 19 अब्ज डॉलर किमतीचे सोने निर्यात केले, जे जागतिक सोन्याच्या निर्यातीपैकी सुमारे पाच टक्के होते.
मुंबई, 27 जून : सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सात देशांचा समूह असलेल्या G7 देशांनी रविवारी रशियाकडून सोन्याच्या आयातीवर बंदी घातली. ही घोषणा G7 शिखर परिषदेच्या (G7 Summit) प्रारंभासोबत करण्यात आली आहे. यापूर्वी, अमेरिकेने असे म्हटले होते की G7 गट रशियाकडून सोन्याच्या आयातीवर निर्बंध घालतील आणि युक्रेनमधील युद्धाच्या प्रयत्नांना रोखण्याच्या उद्देशाने निर्बंध लादतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्विटरवर सांगितले होते की, जी 7 देश एकत्रितपणे घोषणा करतील की आम्ही रशियाकडून सोन्याच्या आयातीवर बंदी घालणार आहोत.
सोन्याच्या निर्यातीत रशियाचा मोठा वाटा आहे, ज्यातून त्याला अब्जावधी डॉलर्सची कमाई होते. G-7 देशांची बैठक जर्मनीत झाली जगातील सात प्रमुख विकसित देशांची संघटना असलेल्या G-7 ची शिखर बैठक जर्मनीतील म्युनिकजवळील एलमाऊ येथे पार पडली. यापूर्वी अशी चर्चा होती की मंगळवारी जी-7 देश या संदर्भात अंतिम निर्णय घेतील. UK ने सुरुवातीला G7 सदस्य कॅनडा, जपान आणि यूएस यांच्या सहकार्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
नवीन लेबर कोडचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल; पगार कमी होणार की वाढणार?
सोन्याच्या निर्यातीतून रशियाला (Sanctions on Russia) अब्जावधी डॉलर्सची कमाई होते, बिडेन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंधनानंतर सोने ही रशियाची दुसरी सर्वात मोठी निर्यात आहे. अशा स्थितीत रशियाकडून सोन्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याने रशियाला जागतिक बाजारपेठेत सहभागी होणे कठीण होणार आहे. बायडेन यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, रशिया त्यांच्या सोन्याच्या विक्रीतून कोट्यवधी डॉलर्स कमवतो.
Pension Scheme: निवृत्तीनंतर मिळवा लाखो रुपयाची पेन्शन; किती गुंतवणूक करावी लागेल?2020 मध्ये 19 अब्ज डॉलर्सची निर्यात
अलिकडच्या काळात रशियाचे उर्जेनंतरचे दुसरे सर्वात मोठे निर्यात उत्पादन आहे. 2020 मध्ये, रशियाने सुमारे 19 अब्ज डॉलर किमतीचे सोने निर्यात केले, जे जागतिक सोन्याच्या निर्यातीपैकी सुमारे पाच टक्के होते. विशेष म्हणजे रशियन सोन्याच्या निर्यातीपैकी 90 टक्के सोने केवळ G-7 देशांना पाठवले जात होते. यापैकी 90 टक्क्यांहून अधिक सोन्याची निर्यात एकट्या रशियाने ब्रिटनला केली. त्याच वेळी, अमेरिकेने 2019 मध्ये रशियाकडून 20 कोटी डॉलरपेक्षा कमी आणि वर्ष 2020 आणि 2021 मध्ये 10 लाख डॉलरपेक्षा कमी किमतीचे सोने आयात केले.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.