Home /News /money /

Multibagger Stock : 'या' केमिकल शेअरची दमदार कामगिरी, वर्षभरात 130 टक्के रिटर्न्स

Multibagger Stock : 'या' केमिकल शेअरची दमदार कामगिरी, वर्षभरात 130 टक्के रिटर्न्स

आत्तापर्यंत 2021 मध्ये, निओजन केमिकल्स कंपनीने 130 टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तसेच, लिस्टिंग झाल्यापासून स्पेशल रासायनिक कंपनीचा स्टॉक 545 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

  मुंबई, 6 डिसेंबर : स्पेशल केमिकल बनवणारी कंपनी निओजेन केमिकल्सने (Neogen Chemicals) एका महिन्यात 35 टक्क्यांच्या वाढीसह जोरदार कामगिरी केली आहे, तर या कालावधीत सेन्सेक्स (Sensex) 4 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनी निओजन केमिकल्स हे ऑरगॅनिक ब्रोमिन बेस्ड केमिकल कम्पाऊंड सोबत इनऑरगॅनिक लिथियम बेस्ड केमिकल कम्पाऊंड तयार करते. 2021 मध्ये आतापर्यंत दिलेला 130 टक्के मल्टीबॅगर परतावा आत्तापर्यंत 2021 मध्ये, निओजन केमिकल्स कंपनीने 130 टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तसेच, लिस्टिंग झाल्यापासून स्पेशल रासायनिक कंपनीचा स्टॉक 545 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. मे 2019 मध्ये, स्टॉक 260 रुपयांच्या पातळीवर होता, जो सध्या सुमारे 1700 रुपयांवर ट्रेड करत आहे.

  Amazon Secret Website:निम्म्या किंमतीत खरेदी करा वस्तू, न आवडल्यास पैसे परत

  कंपनी भांडवल उभारण्याचा विचारात कंपनीने रविवारी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भांडवल उभारण्याची योजना कंपनी करत आहे. भांडवल उभारणीच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची या आठवड्यात 8 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 डिसेंबर 2021 रोजी मूल्यांकन आणि मंजुरीसाठी होणार आहे. New IPO : कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याची संधी, या आठवड्यात तीन आयपीओ येणार ब्रोकरेज हाऊसेस स्पेशॅलिटी केमिकल सेक्टरबाबत पॉझिटिव्ह सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत, कंपनीने एकत्रित आधारावर 11 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे आणि वार्षिक 51.4 टक्क्यांच्या वाढीसह आणि 113 कोटी रुपयांच्या महसुलात 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रोकरेज स्पेशॅलिटी केमिकल्स क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खूप उत्साही आहेत, कारण त्यांना पुढील पाच वर्षांत स्पेशॅलिटी केमिकल्समधील भारताचा हिस्सा दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. गेल्या पाच वर्षांत रासायनिक क्षेत्राची वाढ अभूतपूर्व आहे आणि गुंतवणूकदारांनी त्याच्याशी संबंधित शेअर अनेक पटींनी वाढून चांगले पैसे कमावले आहेत.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Investment, Money, Share market

  पुढील बातम्या