मराठी बातम्या /बातम्या /मनी /New IPO : कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याची संधी, या आठवड्यात तीन आयपीओ येणार

New IPO : कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याची संधी, या आठवड्यात तीन आयपीओ येणार

एखादा आयपीओ चांगला असेल आणि तुम्हाला त्यात गुंतवणूक करायची असेल, तुम्हाला त्याचे शेअर्स मिळावेत, अशी इच्छा असेल तर तुम्ही...

एखादा आयपीओ चांगला असेल आणि तुम्हाला त्यात गुंतवणूक करायची असेल, तुम्हाला त्याचे शेअर्स मिळावेत, अशी इच्छा असेल तर तुम्ही...

गुंतवणूकदारांना Ratgain Travel Technologies IPO, Shriram Properties IPO, Metro Brands IPO आणि MapMy India IPO मध्ये गुंतवणुकीची करण्याची संधी मिळेल. या कंपन्या 6 ते 14 डिसेंबर दरम्यान प्राथमिक बाजारात प्रवेश करणार आहेत.

मुंबई, 6 डिसेंबर : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना IPO मध्ये गुंतवणूक करुन कमाईची संधी असते, त्यामुळे कमी वेळेत जास्त पैसे कमवण्साठी सर्वच गुंतवणूकदार नव्या IPO ची वाट पाहून असतात. या आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून उत्तम पैसे कमावण्याची संधी मिळेल. या आठवड्यात अनेक IPO बाजारात लिस्टिंग होणार आहेत. गुंतवणूकदारांना Ratgain Travel Technologies IPO, Shriram Properties IPO, Metro Brands IPO आणि MapMy India IPO मध्ये गुंतवणुकीची करण्याची संधी मिळेल. या कंपन्या 6 ते 14 डिसेंबर दरम्यान प्राथमिक बाजारात प्रवेश करणार आहेत. यावर्षी लॉन्च झालेल्या बहुतांश IPO ने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. पेटीएम आयपीओसह काही IPO आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे.

RateGain IPO

भारतातील हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल उद्योगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी, RateGain Travel चा IPO 7 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल. 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान 1,336 कोटी रुपयांसाठी IPO मध्ये पैसे गुंतवले जाऊ शकतात. या IPO अंतर्गत 375 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत सुमारे 2.26 कोटी इक्विटी शेअर्स विकले जातील. या IPO अंतर्गत, 1 रुपये फेस वॅल्यू असलेल्या शेअर्ससाठी 405-425 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित करण्यात आला आहे.

या IPO साठी 35 शेअर्सचा लॉट निश्चित करण्यात आले आहेत. प्राइस बँडच्या वरच्या किमतीनुसार, गुंतवणूकदारांना किमान 17875 रुपये गुंतवावे लागतील. तज्ज्ञांना असा विश्वास आहे की शेअर दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देऊ शकते.

मुंबईत पेट्रोल 110 रुपयांवर, आजही इंधनामुळे सामान्यांच्या खिशाला चाप

Shriram Properties IPO

रिअल इस्टेट कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचा IPO 8 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. कंपनीने या IPO मधून सुमारे 600 कोटी रुपये उभारण्याचे टार्गेट ठेवले आहे. श्रीराम प्रॉपर्टीजच्या IPO मध्ये 250 कोटींचे नवीन इक्विटी शेअर्स आणि 350 कोटींचे ऑफर फॉर सेल (OFS) आहेत. ऑफर फॉर सेल अंतर्गत, कंपनीचे प्रमोटर आणि गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विक्रीसाठी देतात. श्रीराम प्रॉपर्टीजला 2019 मध्येच 1250 कोटी रुपयांच्या IPO साठी SEBI कडून मंजुरी मिळाली.

MapmyIndia IPO

डिजिटल मॅप मेकर MapmyIndia पब्लिक ऑफर (MapmyIndia IPO) साठी 9 डिसेंबर रोजी IPO लाँच करणार आहे. कंपनीने IPO च्या माध्यमातून 1200 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे.

MapmyIndia हे Google Maps प्रमाणेच लोकेशन नेव्हिगेशन अॅप आहे. ISRO आणि MapmyIndia यांनी हे अॅप विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. याशिवाय, कंपनी एमजी मोटर्स आणि बीएमडब्ल्यू कारची नेव्हिगेशन सिस्टम देखील चालवते.

मॅप माय इंडिया आयपीओ पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर (OFS) असेल. यामध्ये कंपनीच्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना त्यांचे स्टेक विकण्याची संधी मिळेल.

कोरोना काळातही कृषी आणि प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत 13 टक्क्यांनी वाढ

 Metro Brands IPO

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची गुंतवणूक असलेल्या मेट्रो ब्रँड्स लि. चा IPO 10 डिसेंबर रोजी ओपन होणार आहे. फुटवेअर क्षेत्रातील किरकोळ विक्रेते मेट्रो ब्रँड्स IPO अंतर्गत 295 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करतील. याशिवाय, प्रमोटर्स आणि इतर भागधारक 2.14 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) आणतील.

IPO कागदपत्रांनुसार, कंपनीचा इश्यू 14 डिसेंबर रोजी बंद होईल. IPO च्या माध्यमातून कंपनीचे प्रमोटर्स त्यांचे जवळपास 10 टक्के स्टेक विकतील. IPO नंतर कंपनीतील प्रमोटर्स आणि प्रमोटर समुहाची भागीदारी सध्याच्या 85 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर येईल.

IPO मधून मिळणारे पैसे कंपनी 'मेट्रो', 'मोची', 'वॉकवे' आणि 'क्रॉक्स' या ब्रँड अंतर्गत नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट व्यवसायासाठी वापरतील. सध्या कंपनीची देशातील 134 शहरांमध्ये 586 स्टोअर्स आहेत. यापैकी गेल्या तीन वर्षांत 211 दुकाने सुरू झाली आहेत.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market