• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • SIP: 14,500 रुपयांची गुंतवणूक करून उभा करा 23 कोटींचा फंड, वाचा सविस्तर

SIP: 14,500 रुपयांची गुंतवणूक करून उभा करा 23 कोटींचा फंड, वाचा सविस्तर

जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये स्मार्ट पद्धतीने (Smart Investment in Mutual Fund) लाँग टर्मसाठी गुंतवणूक केली तर वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सहज 23 कोटींचा फंड उभा करू शकता.

 • Share this:
  मुंबई, 10 नोव्हेंबर: गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा वापर करत भविष्याची तरतूद करण्यासाठी फंड उभारला जातो. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकही वाढली आहे. तुम्ही यामध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास (Investment tips) चांगला रिटर्न मिळवू शकता. शिवाय या गुंतवणुकीतून उभा राहणारा फंड तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकर करू शकतो. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये स्मार्ट पद्धतीने (Smart Investment in Mutual Fund) लाँग टर्मसाठी गुंतवणूक केली तर वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सहज 23 कोटींचा फंड उभा करू शकता. मात्र याकरता तुम्ही योग्य वेळी गुंतवणूक करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. तुम्ही सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनिंगचा अर्थात मंथली SIP (Mutual fund SIP) चा वापर करून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र योग्य गुंतवणूक न केल्यास तुमचे उत्पन्न वाढणार नाही. लवकर सुरू करा गुंतवणूक कर तज्ज्ञांच्या मते, जर एखादा गुंतवणूकदार वयाच्या 25 व्या वर्षी SIP मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करतो आणि सेवानिवृत्तीपर्यंत गुंतवणूक करतो, तर तो संपूर्ण 35 वर्षे सतत गुंतवणूक करतो. यामुळे गुंतवणूकदाराला चक्रवाढ व्याजाचा चांगला लाभ मिळतो. त्यामुळे निवृत्तीच्या वेळी मोठा निधी तयार होतो. हे वाचा-15 नोव्हेंबरला आहे जबरदस्त कमाईची संधी, येतोय आणखी एका कंपनीचा IPO अन्य कर तज्ज्ञांच्या मते, 35 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर, गुंतवणुकीवर 12 ते 16 टक्के परतावा मिळतो. गुंतवणूकदाराला गुंतवणुकीदरम्यान आणि नंतरची चलनवाढ लक्षात घेऊन 20 कोटींचा निधी तयार कराता येईल. हे वाचा-Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील शेअरमधून गुंतवणूकदार मालामाल कर तज्ज्ञांच्या मते, समजा एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 25 व्या वर्षी दरमहा 14500 कोटी रुपयांची एसआयपी सुरू केली आणि वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत त्यात गुंतवणूक केली, या गुंतवणूकदाराला साधारण 12 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल, तर गुंतवणूकदार  22.93 कोटी रुपयांचा फंड उभार करू शकतो. SIP गुंतवणूकदाराला निवृत्तीच्या वेळी श्रीमंत बनवू शकते. अर्थात तुम्ही कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता यावर तुम्हाला मिळणारा परतावा अवलंबून आहे. त्यामुळे कोणत्याही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट एक्सपर्ट्सचा सल्ला अवश्य घ्या.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: