मुंबई : कार चालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर कार घेऊन घराबाहेर जात असाल आणि ही चूक केली तर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. आजपासून सीटबेल्टबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. आजपासून कारमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्यांनाही सीटबेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
नियमाचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई न करता वाहतूक पोलीस कडक समज देणार असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी दिल्लीमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्यांना सीटबेल्ट लावण्याचे नियम कठोर करण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये तर दंडात्मक कारवाईला देखील सुरुवात झाली आहे. जे नियम मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे.
टायर्स म्हणजे गाडीची आणि गाडीतल्या प्रवाशांचीही लाइफलाइन, कशी कराल देखभाल?
चारचाकी वाहनांमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना आजपासून सीट बेल्टची सक्ती करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. 15 दिवसांचा अवधी दिल्यानंतर आजपासून मुंबई वाहतूक विभागाकडून सहप्रवाशांना सीट बेल्ट नसेल तर कारवाईला सुरुवात होणार आहे.
शिवसंग्रामचे माजी आमदार विनायक मेटे आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं रस्ते अपघातामध्ये निधन झालं. त्यानंतर पुन्हा एकदा सीट बेल्टचा मुद्दा ऐरणीवर आला. दिवसेंदिवस वाढणारे अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानीची आकडेवारी लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही कठोर नियम लावण्यात आले आहेत.
एखादा पाळीव प्राणी कारला धडकून अपघात झाल्यास चालकावर कारवाई होते का?
या नियमांची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर कार घेऊन बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला मागच्या सीटवर बसणाऱ्यांनाही सीटबेल्ट लावणं बंधनकारक असणार आहे. नाहीतर खिशाला मोठा दंड लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Mumbai, Mumbai police, Traffic, Traffic police, Traffic Rules