टोयोटा इनोव्हाला भारतीय बाजारपेठेत प्रचंड यश मिळालं आहे. MPV च्या नवीन प्रकाराला इनोव्हा हायक्रॉस असे म्हटलं जाईल आणि ते वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या इनोव्हा क्रिस्टापेक्षा हे मोठे मॉडेल असेल. टोयोटाने मोनोकोक चेसिस, फ्रंट-व्हील ड्राइव्ह पॉवरट्रेन वापरण्यासारखे काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ही कार फक्त पेट्रोल इंजिनसह येईल.
मारुती सुझुकीनं देखील इनोव्हा हायक्रॉस-बेस्ड MPV चे व्हेरियंट बनवण्याची अपेक्षा आहे. भारतीय बाजारपेठेसाठी मारुती सुझुकीकडून टोयोटा वाहन रिबॅज करण्याची ही पहिलीच वेळ असेल. ही कार समान बेस, इंजिन आणि ट्रान्समिशनसह येईल. परंतु बाह्य डिझाइन भिन्न असू शकते.
द फोर्स गुरखाच्या 5-डूअर आवृत्तीवर काम करत आहे. ती लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाईल. यात लांब व्हीलबेस आहे परंतु थ्री डोअर मॉडेलप्रमाणं रुंदी कायम ठेवण्यात आली आहे. व्हीलबेस वाढवल्यानंतर, फोर्सने तिसऱ्या रांगेतील सीटसाठी जागा तयार केली आहे. फोर्स इंजिनमध्ये कोणतेही बदल करणार नाही अशी अपेक्षा आहे.
C3 चा 7-सीटर व्हेरियंट भारतीय रस्त्यांवर अनेकदा दिसलं आहे. आतापर्यंत, C3 हे Citroen च्या लाइनअपमधील सर्वात परवडणारे वाहन आहे. C3 चा 7-सीटर प्रकार 5-सीटर वेरिएंटपेक्षा अधिक प्रीमियम असेल. यात टर्बोचार्ज केलेले इंजिन मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो.
निसान एक्स-ट्रेलची सध्या चौथ्या पिढी येत आहे. कंपनीनं अलीकडेच या एसयूव्हीला त्याच्या सात-सीटर अवतारात सादर केले. X-Trail पेट्रोल हायब्रिड इंजिनसह येण्याची दाट शक्यता आहे.