जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: काय आहे मुंबई-पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव, इथे तपासा लेटेस्ट रेट

Gold Price Today: काय आहे मुंबई-पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव, इथे तपासा लेटेस्ट रेट

Gold Price Today: काय आहे मुंबई-पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव, इथे तपासा लेटेस्ट रेट

आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rate Today Mumbai) 49200 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 45100 रुपये आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी: आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rate Today Mumbai) 49200 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 45100 रुपये आहे. पुण्यात आज (Gold Rate Today Pune) 24 कॅरेट सोन्याचा भाव 49060 रुपये आहे. तसंच 22 कॅरेटचा रेट 45050 रुपये आहे. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोने दर 47,918 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्याआधीच्या सत्रात गुरुवारी सोन्याचा भाव 47,884 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. एचडीएफसी सिक्योरिटीजने (HDFC Securities) या रेटबबात माहिती देताना सांगितलं, की सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीत झालेल्या वाढीमुळे सोने दरात वाढ झाल्याचं चित्र आहे. Goodreturns नुसार आज मुंबईत चांदीचा रेट (Silver Rate Today) एक किलोसाठी 61000 रुपये आहे. तर पुण्यातही एक किलो चांदीचा भाव 61000 रुपये आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली होती. या वाढीसह चांदीचा दर 61,006 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. त्याआधीच्या सत्रात गुरुवारी हा दर 60,676 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.

हे वाचा -  तुमच्याकडे असणारी 500 ची नोट नकली तर नाही ना? अशाप्रकारे झटक्यात ओळखा

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

हे वाचा -  आता जमिनींसाठीही असणार ‘आधार’ सारखा नंबर, PM KISAN योजनेसाठी ठरेल फायदेशीर

दरम्यान, कोरोना काळतही सोन्याची मागणी वाढल्याने भारतात 2021 मध्ये सोन्याचा व्यापार 797.3 टन इतका झाला. या नव्या वर्षातही वाढीचा कल कायम राहण्याची आशा आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC) गोल्ड डिमांड ट्रेंड 2021 अहवालात सांगितलं, की 2020 मध्ये सोन्याची मागणी 446.4 टन वरुन 2021 मध्ये 78.6 टक्के वाढीसह 797.3 टन इतकी झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात