मुंबई, 15 जून : तुम्ही नोकरी शोधताय का? तुम्हाला क्लार्कची नोकरी हवीय? मग एक सुवर्णसंधीच आहे. मुंबई उच्च न्यायालयात क्लार्क पदासाठी अर्ज मागवलेत. या पदासाठी 182 जागा आहेत.
एकूण जागा - 182
पदाचं नाव - लिपिक ( क्लार्क )
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी , इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट, MS-CIT किंवा समतुल्य
नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. अर्जाची फी आहे 25 रुपये. अर्ज online करण्याची शेवटची तारीख आहे 17 जून 2019
अर्ज https://bombayhighcourt.nic.in/ इथे आॅनलाइन करावा लागेल.
एअर इंडियात नोकरी करायचीय? 'या' पदांवर 248 जागांसाठी भरती
World Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार!
दरम्यान, मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यांमध्ये नोकऱ्या आणि रोजगार वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. नीती आयोग आता नव्या सरकारसाठी आर्थिक अजेंडा बनवणार आहे. यामध्ये देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.
छोट्या मुलांचा जाडेपणा कमी करण्यासाठी FSSAI नं घेतला 'हा' निर्णय
या आर्थिक अजेंड्यामध्ये खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक, शेती उत्पादन वाढवण्यावर भर आणि रोजगार वाढवण्यासाठीच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. विरोधकांनी या निवडणुकीत रोजगार कमी झाल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरलं होतं पण लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर या मुद्द्यावरून जनतेने सरकारला नाकारलेलं नाही हेच लक्षात येतं.
कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी सरकार खाजगी शिक्षण संस्थांना कर्ज देणार आहे. त्याशिवाय खाजगी कंपन्यांना सवलती देण्याचाही सरकार विचार करत आहे. स्किल इंडियासाठी सरकारने 3400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आता हा निधी आणखी वाढवण्यात येईल.
VIDEO: 10 जणांचा चावा घेणारे माकड वन विभागाच्या पिंजऱ्यात