मुंबई, 15 जून : तुम्हाला एअर इंडियात काम करायचं असेल तर चांगली संधी चालून आलीय. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये 248 जागांची भरती आहे. कस्टमर एजेंट, ड्युटी मॅनेजर -टर्मिनल,ड्युटी ऑफिसर, ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/Administration), असिस्टंट (HR/Administration), डेटा अनॅलिस्ट, हॅंडिमन, ऑफिसर (HR/Administration), ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (HR/Administration) या पदांसाठी अर्ज मागवलेत. पदांची संख्या कस्टमर एजंट- 111 ड्युटी मॅनेजर -टर्मिनल - 6 ड्युटी ऑफिसर - 10 ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (HR/Administration)-11 FACEBOOK ने पहिल्यांदाच केली भारतात गुंतवणूक, तरुणांच्या ‘या’ Startup ची चर्चा असिस्टंट (HR/Administration) - 06 डेटा अनॅलिस्ट - 2 हॅंडिमन - 100 ऑफिसर (HR/Administration) - 1 ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (HR/Administration) - 1 खासगी क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी सरकारी नोकरी उपलब्ध, ‘इथे’ आहेत संधी शैक्षणिक पात्रता कस्टमर एजंट या पदासाठी पदवीधर आणि IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA -CARGO डिप्लोमा किंवा अनुभव हवा. ड्युटी मॅनेजर टर्मिनलसाठी पदवीधर आणि 16 वर्ष अनुभव हवा. ड्युटी आॅफिसर पदासाठी पदवीधर आणि IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA -CARGO डिप्लोमा , 10 वर्ष अनुभव हवा. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (HR/Administration) या पदासाठी MBA, 1 वर्ष अनुभव किंवा पदवीधर आणि 5 वर्ष अनुभव हवा. असिस्टंटसाठी पदवीधर आणि 2 वर्ष अनुभव हवा. ई वाॅलेटमध्ये मित्रानं पैसे ट्रान्सफर केले तर कर लागतो का? डेटा अनॅलिस्ट जागेसाठी पदवीधर आणि 1 वर्ष अनुभव हवा. हँडिमनला मुंबई विमानतळावर 6 महिन्याचा अनुभव हवा. आॅफिसर म्हणून अर्ज करायचा असेल तर MBA पदवी हवी आणि 4 वर्षांचा अनुभव हवा. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (HR/Administration)साठी MBA,1 वर्ष अनुभव किंवा पदवीधर, 5 वर्ष अनुभव हवा. या पदांसाठी 28 ते 55 वर्षापर्यंत वय हवंय. नोकरीचं ठिकाण मुंबई, नाशिक, शिर्डी, कोल्हापूर, नांदेड आणि दिल्ली असेल. अर्ज फी जनरल आणि ओबीसीसाठी 500 रुपये. SC/ST/ExSM साठी फी नाही. अधिक माहितीसाठी http://www.airindia.in/ यावर लाॅग इन करा. SPECIAL REPORT: भारत-पाकिस्तान सामन्याआधी ‘अॅडवॉर’