मराठी बातम्या /बातम्या /मनी /E-Commerce Job Fraud: एका SMS च्या जाळ्यात अडकला अन् गमावून बसला 3 लाख, तुम्हालाही आलाय असा मेसेज?

E-Commerce Job Fraud: एका SMS च्या जाळ्यात अडकला अन् गमावून बसला 3 लाख, तुम्हालाही आलाय असा मेसेज?

जर तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीमध्ये नोकरीची ऑफर (Job Offer in E-Commerece Company) मिळाली तर वेळीच सावध व्हा, कारण ती फसवणूक (Beware of Fake job Offers) देखील असू शकते.

जर तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीमध्ये नोकरीची ऑफर (Job Offer in E-Commerece Company) मिळाली तर वेळीच सावध व्हा, कारण ती फसवणूक (Beware of Fake job Offers) देखील असू शकते.

जर तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीमध्ये नोकरीची ऑफर (Job Offer in E-Commerece Company) मिळाली तर वेळीच सावध व्हा, कारण ती फसवणूक (Beware of Fake job Offers) देखील असू शकते.

मुंबई, 30 सप्टेंबर: जर तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीमध्ये नोकरीची ऑफर (Job Offer in E-Commerece Company) मिळाली तर वेळीच सावध व्हा, कारण ती फसवणूक (Beware of Fake job Offers) देखील असू शकते. अशाच एका फसवणुकीत मुंबईतील वडाळा याठिकाणी राहणाऱ्या एका तरुणाला 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या तरुणाने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना तुमच्यासह देखील घडू शकते, त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे.

वडाळातील सीजीएस कॉलनीमध्ये राहणारा एक 26 वर्षीय तरुण पारस (काल्पनिक नाव) याला एक एसएमएस आला. या मेसेजमध्ये असं नमुद करण्यात आलं होतं की एका प्रसिद्ध कंपनीसह पार्ट टाइम जॉब केल्यास तुम्हाला प्रति दिन जवळपास 8000 रुपये मिळतील. अर्थात ही रक्कम महिन्याला साधारण 2-अडीच लाख होईल. यामुळे पारसलाही वाटलं की ही चांगली संधी आहे आणि ती मिस करायची त्याची इच्छा नव्हती. त्या मेसेजमध्ये एक WhatsApp Link देखील होती. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नंबर ओपन झाला आणि समोरील व्यक्तीने तिचं नाव मरस्या असं सांगितलं.

हे वाचा-चांदीमध्ये 1300 रुपयांपेक्षा जास्त घसरण, 45 हजारांहून कमी झालं सोनं

त्या मुलीने पारसला नोकरीच्या संधीबाबत सांगितलं. तिने असं सांगितलं की, मी तुम्हाला नोंदणी लिंक पाठवत आहे. त्या लिंकवर जाऊन स्वतःची नोंदणी करा. पारसनेही तेच केले. पारसने त्याचे तपशील त्या लिंकवर शेअर करताच आणखी काही लोकांनी त्याला फोन करण्यास सुरुवात केली. त्या लोकांनी सांगितले की ते ई-कॉमर्स कंपनीशी बोलत आहेत. त्याने पारसला अशा प्रकारे बोलण्यात गुंतवले की त्याला असं वाटलं की त्याची नोकरी पक्की झाली आहे. त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर या व्यक्तींनी त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी पुढील चाल खेळली. त्यांनी असं सांगितलं की आता काही पैसे जमा केल्यास मोठा बोनस मिळेल. अशाप्रकारे थोड्या-थोड्या कालावधीने पारसने एकूण 3 लाख 4 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांत ट्रान्सफर केले. जेव्हा अजिबात बोनस मिळाला नाही आणि उलट त्याचेच पैसे गेले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्यासह फ्रॉड झाला आहे.

हे वाचा-पोस्ट ऑफिस उद्यापासून बदलणार ATM कार्ड आणि ट्रान्झॅक्शन संदर्भातील नियम

फ्रॉडपासून कसे वाचाल?

1. तुमच्या कार्डचा (क्रेडिट किंवा डेबिट) तपशील इतर कोणाशीही शेअर करू नका.

2. कुणाच्याही सांगण्यावरून तुमच्या फोनवर कोणतेही अॅप इन्स्टॉल करू नका. एखाद्या App चा सोअर्स माहित असल्याशिवाय ते डाउनलोड करणे धोकादायक ठरेल, बँकांकडून देखील वेळोवेळी याबाबत सूचना दिल्या जातात.

3. जर कुणी संशयास्पद लिंक शेअर केली तर त्यावर क्लिक करू नका. मेसेज किंवा मेलच्या माध्यमातून अशा लिंक पाठवल्या जातात.

4. जर तुम्हाला अर्धवेळ किंवा पूर्णवेळ नोकरी मिळवण्यासाठी पैसे मागितले तर ते देऊ नका, कारण ती 100% फसवणूक असेल.

First published:

Tags: Financial fraud, Money fraud, Online fraud