नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: भारतीय सराफा बाजारात आज 30 सप्टेंबर 2021 रोजी चांदीच्या दरात मोठी (Silver Price down Today) घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे चांदीचे दर 58 हजार रुपये प्रति किलोपेक्षाही कमी झाले आहेत. तर सोन्याचे दर (Gold Price Today) देखील आज कमी झाले आहेत. आजच्या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा 45 हजार रुपयांपेक्षाही कमी आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 45,130 रुपये होते. तर चांदीचे दर 58,692 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. दरम्यान भारतीय बाजारांच्या उलट परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात (Gold Price Today in International Market) पाहायला मिळाली. याठिकाणी आज सोन्याच्या दरात तेजी आली आहे. तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही आहे.
सोन्याचे नवे दर
गुरुवारी सोन्याचा भाव 154 रुपये प्रति तोळाने कमी झाला आहे. या घसरणीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर दिल्लीतील सराफा बाजारात 44,976 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर 1,733 डॉलर प्रति औंसवर आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये आज सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे.
हे वाचा-Flipkart Big Billion Days मध्ये मोबाइल, लॅपटॉप, कपड्यांवर मिळेल 80% पर्यंत सूट
चांदीचे नवे दर
चांदीच्या किंमतीत देखील आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीचे दर 1,337 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. यामुळे चांदी आज 57,355 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल न झाल्याने दर 21.64 डॉलर प्रति औंसवर आहेत.
हे वाचा-आजच पूर्ण करा ही 6 आर्थिक आणि बँकेशी संबधित कामं, अन्यथा होईल मोठं नुकसान
का कमी झाले सोन्याचे दर?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, अमेरिकन फेड रिझर्व्हकडून प्रोत्साहन पॅकेजमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस $ 1730 च्या आसपास आहे. त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारांवरही दिसून येत आहे. सोन्यात सातत्याने चढउतार असल्यामुळे त्यचा परिणाम चांदीच्या किंमतीवरही आहे, कारण चांदीवरही दबाव कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today