Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ची मुंबईत मोठी कारवाई, 191 कोटींची रहिवासी इमारत जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ची मुंबईत मोठी कारवाई, 191 कोटींची रहिवासी इमारत जप्त

सक्तवसूली संचालनालयाने (ED action against Residential Building in Mumbai) मनी लाँड्रिंग कायदा (PMLA 2002) अंतर्गत मुंबईत 191 कोटी रुपयांची निवासी इमारत जप्त केली आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 02 ऑक्टोबर: सक्तवसूली संचालनालयाने (ED action against Residential Building in Mumbai) मनी लाँड्रिंग कायदा (PMLA 2002) अंतर्गत मुंबईत 191 कोटी रुपयांची निवासी इमारत जप्त केली आहे. एजन्सीने शनिवारी या कारवाईबाबत माहिती दिली. अहवालांनुसार, ही इमारत मुंबईच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक असणाऱ्या वरळी (ED Attached Residential Building in Worli) भागात आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार ही कारवाई भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड (BPSL) संबंधित एका बँक फ्रॉड प्रकरणी करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 4420 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

25 जणांविरोधात चार्जशीट

2019 पासून ईडी याप्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयच्या एका तक्रारीनंतर झाली होती. ईडीने याप्रकरणात मनी लाँड्रिंगबाबत तपास सुरू केला. सीबीआयने असे आरोप केले होते की, या कंपनीचे प्रमोटर बँकेची फसवणूक करण्याच्या प्रकरणात सहभागी होते. याप्रकरणी एजन्सीने एक चार्जशीट देखील दाखल केली होती. ज्यानुसार बीपीएसएलचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) संजय सिंघल यांच्यासह 25 जण आरोपी होते.

हे वाचा-जगातील या श्रीमंत उद्योगपतीसमोर मोठी समस्या, 21 कर्मचाऱ्यांचे गंभीर आरोप

बँकेकडून घेतलेल्या कर्जामधील हा फ्रॉड समोर आला आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जावर बीपीएसएलने डिफॉल्ट केले आहे. या प्रकरणी खात्यांमध्ये घोटाळा झाला आणि कंपनीच्या संचालकांनी बनावट कंपन्यांच्या आधारे  फसवणूक करून पैसे डायव्हर्ट केले आहेत.

हे वाचा-सप्टेंबर महिन्यात 4%ने उतरलं सोनं, फेस्टिव्ह सीझनआधी खरेदीची आहे सुवर्णसंधी?

सीबीआयने एका अधिकृत वक्त्यव्यामध्ये म्हटले आहे की, बीपीएसएलने विविध बँकांकडून घेतलेली कर्जाच्या स्वरुपातील रक्कम हस्तगत करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. दरम्यान ईडीचे असे म्हणणे आहे की, मुंबईतील जी इमारत आज जप्त करण्यात आली आहे ती देखील खात्यांमध्ये हेराफेरी करून खरेदी करण्यात आली होती.

First published:

Tags: Case ED raids, Mumbai