मुंबई, 7 फेब्रुवारी : नोकरी करणाऱ्या जवळपास सर्वांचेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO मध्ये देखील खाते असते. ज्यामध्ये तुमच्या पगाराचा काही भाग जमा केला जातो. आता पीएफ नियमांमध्ये काही नवीन बदल होणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून सध्याची पीएफ खाती दोन भागात विभागली जाण्याची शक्यता आहे.
या पीएफ खात्यांवर 1 एप्रिलपासून कर आकारला जाईल
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, सरकारने नवीन आयकर नियम अधिसूचित केले होते, ज्या अंतर्गत पीएफ खात्यांचे दोन भाग केले जातील. या नियमामुळे कर्मचार्यांचे वार्षिक योगदान 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास केंद्राला पीएफ उत्पन्नावर कर आकारण्याची परवानगी मिळेल. नवीन नियमांचा उद्देश उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना सरकारी कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यापासून रोखणे हा आहे.
Investment Tips: गुंतवणुकीसाठी Voluntary Provident fund चांगला पर्याय, टॅक्स बचतीचाही फायदा
1 एप्रिलपासून लागू होणार्या नवीन पीएफ नियमांचे मुख्य मुद्दे
>> सध्याची सर्व पीएफ खाती करपात्र आणि करपात्र नसलेल्या योगदान खात्यांमध्ये विभागली जातील.
>> सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच CBDT नुसार, त्यांचे बंद खाते देखील करपात्र नसलेल्या खात्यांमध्ये समाविष्ट केले जाईल कारण त्याची तारीख 31 मार्च 2021 आहे.
>> अधिकृत सूत्रांनुसार, नवीन पीएफ नियम पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2022 पासून लागू केले जाऊ शकतात.
>> वार्षिक 2.5 लाखांपेक्षा जास्त कर्मचार्यांच्या योगदानातून (Employee Contrubution) पीएफ उत्पन्नावर नवीन कर लागू करण्यासाठी आयटी नियमांतर्गत नवीन कलम 9D समाविष्ट केले गेले आहे.
>> करपात्र व्याज मोजण्यासाठी सध्याच्या पीएफ खात्यात दोन स्वतंत्र खाती तयार केली जातील.
LIC IPO : तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असेल तर स्वस्तात मिळणार शेअर
नवीन नियमाचा कुणाला फटका बसणार?
2.5 लाख रुपयांच्या मर्यादेचा फायदा बहुतेक पीएफ ग्राहकांना होईल. लहान आणि मध्यमवर्गीय करदात्यांना नवीन नियमाचा फटका बसणार नाही. याचा प्रामुख्याने उच्च उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.