मुंबई, 17 सप्टेंबर : UPL Ltd ही भारताबरोबरच जगातील सर्वात मोठी अॅग्रोकेमिकल कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या 2 दशकांमध्ये या कंपनीने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे आणि त्यांना करोडोंचा नफा मिळवून दिला आहे. गुंतवणुकदारांनी संयमाने योग्य कंपनीत दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर अवघ्या काही हजारांच्या गुंतवणुकीत ते मालामाल होऊ शकतात याचे हे उदाहरण आहे. शुक्रवार, 16 सप्टेंबर रोजी NSE वर UPL Ltd चे शेअर्स 704.55 रुपयांवर बंद झाले. 20 वर्षांपूर्वी जेव्हा 5 जुलै 2022 रोजी UPL शेअरनी प्रथम NSE वर व्यापार सुरू केला तेव्हा त्याची किंमत फक्त 1.20 रुपये होती. तेव्हापासून त्याची किंमत सुमारे 58,612.50 टक्क्यांनी वाढली आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने आजपासून 20 वर्षांपूर्वी UPL Ltd च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपयांचे मूल्य 58,612.50% ने वाढून 5.87 कोटी रुपये झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी केवळ 18 हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या 18 हजार रुपयांचे मूल्य 1 कोटी 5 लाख रुपये झाले असते आणि तो करोडपती झाला असता.
Aadhar Card: ब्लू आधारकार्ड काय असतं? कुणासाठी वापरलं जातं आणि कसं तयार करायचं?
यूपीएल लिमिटेडच्या शेअर्सच्या अलीकडील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या एका महिन्यात ते सुमारे 10.87 टक्क्यांनी घसरले आहे. गेल्या वर्षभरात शेअरची किंमत सुमारे 5 टक्क्यांनी घसरली आहे. तर गेल्या 5 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 31 टक्के परतावा दिला आहे.
कर्जाच्या EMIचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता; महागाईचा काय परिणाम होणार?
ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी कृषी रसायने, औद्योगिक रसायने, केमिकल इंटरमीडिएट्स आणि विशेष रसायनांचे उत्पादन आणि विपणन करते. याव्यतिरिक्त, कंपनी पीक संरक्षणाशी संबंधित उपाय देखील पुरवते. कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, Arysta LifeScience चे अधिग्रहण केल्यानंतर ती आता जगातील 5वी सर्वात मोठी अॅग्रोकेमिकल कंपनी बनली आहे. ग्लोबल फूड सिस्टीम्समधील ही एक आघाडीची कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्याची वार्षिक कमाई $504 दशलक्ष होती आणि 138 पेक्षा जास्त देशांमध्ये त्याची उपस्थिती आहे.