जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Inflation : कर्जाच्या EMIचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता; महागाईचा काय परिणाम होणार?

Inflation : कर्जाच्या EMIचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता; महागाईचा काय परिणाम होणार?

Inflation : कर्जाच्या EMIचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता; महागाईचा काय परिणाम होणार?

Inflation: ऑगस्ट महिन्यातील किरकोळ महागाईचा आकडा 7 टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलैमध्ये तो 6.7 टक्के होता. गेल्या तीन महिन्यांपासून किरकोळ महागाई दरात घट झाली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 सप्टेंबर : भारतात महागाईमुळे जनता चिंतीत आहे. महागाईमुळे अनेकांचा बजेट कोलमडत आहे. अमेरिकेतही किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर झाली आहे. दोन्ही देशांमध्ये महागाई हा चिंतेचा विषय आहे. त्याचा परिणाम दोन्ही देशांमध्ये पाहायला मिळणार आहे. यूएस फेडसोबतच रिझर्व्ह बँकेकडूनही व्याजदरात वाढ अपेक्षित आहे. त्याचा थेट परिणाम कर्जाचा EMI भरणाऱ्या बँक ग्राहकांवर होणार आहे. यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज पूर्वीपेक्षा महाग होणार आहे. जर तुम्ही आधीच कर्जावर घर घेतले असेल तर तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. किरकोळ महागाई 7 टक्क्यांवर अमेरिकेत महागाईचा दर विक्रमी पातळीवर असल्याने त्याचा परिणाम अमेरिकन शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावरही दिसण्याची शक्यता आहे. भारतात 12 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या ऑगस्ट महिन्यातील किरकोळ महागाईचा आकडा 7 टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलैमध्ये तो 6.7 टक्के होता. गेल्या तीन महिन्यांपासून किरकोळ महागाई दरात घट झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा आकडा 5.3 टक्के होता. दुसरीकडे, मंगळवारी अमेरिकेत सीपीआय डेटा जाहीर करण्यात आला. त्यानुसार, मासिक CPI ऑगस्टमध्ये 8.3 टक्के दराने वाढला. येथे जूनमध्ये 40 वर्षांतील सर्वोच्च महागाई 9.1 टक्के नोंदवली गेली. Multibagger Share: एका शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, एक लाखांची गुंतवणूक बनली अडीच कोटी अमेरिकेच्या ताज्या CPI डेटावरून, असे मानले जाते की US फेड रिझर्व्ह व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवेल. पुढील आठवड्यात 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत फेडकडून व्याजदरातील बदलाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. यूएस फेडने या वर्षात चार वेळा व्याजदरात बदल जाहीर केले आहेत. भारतातही मे महिन्यापासून व्याजदरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. SBI आणि PNB खातेधारकांनी हे नंबर सेव्ह करा, अनेक सुविधांचा लाभ घरबसल्या मिळेल महागाई वाढल्यामुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या महिन्यात सादर होणार्‍या MPC मध्ये पुन्हा रेपो दर वाढवू शकते. किरकोळ महागाई दोन टक्क्यांच्या फरकाने चार टक्क्यांवर ठेवण्याची जबाबदारी सरकारने आरबीआयवर सोपवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक 28-30 सप्टेंबर रोजी होणार आहे. पॉलिसी रेटमध्ये सलग तीन वेळा 1.40 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळीही रेपो दरात वाढीचा अंदाज वर्तवला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात