मुंबई, 17 सप्टेंबर : आधार कार्ड हे सर्वांसाठीच आता महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. लहान मुलांसाठीही आधार खूप महत्त्वाचा झाला आहे. आधार नसल्यामुळे मुलांना अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. पाच वर्षांखालील मुलांसाठी आधार कार्ड बनवण्याची प्रक्रिया कशी असते याबद्दल सांगणार आहोत. आधारच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे नवजात मुलांचे आधार कार्डही सहज तयार होते. UIDAIने लहान मुलांसाठी ब्लू आधार सुरू केलं आहे. पाच वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डवर निळ्या रंगाच्या अक्षरात छपाई केलेली असते. त्यामुळे त्याला ब्लू आधार म्हणतात. बाल आधारकार्ड मिळवण्यासाठी बालकाचं बर्थ सर्टिफिकेट आणि पालकांपैकी एकाचं आधार कार्ड आवश्यक आहे. कारण, लहान मुलांचा आधार क्रमांक पालकांपैकी एकाच्या आधार क्रमांकाशी जोडलेला असतो. पाच वर्षांखलील मुलांच्या आधार कार्डसाठी बायोमेट्रिक्स कॅप्चर केले जात नाहीत. पालकांचा डेमोग्राफिक डेटा आणि त्यांच्या यूआयडीशी जोडलेली फेस आयडी वापरून मुलांचा यूआयडी प्रोसेस केला जातो. जेव्हा मूल पाच आणि 15 वर्षांचं होईल तेव्हा त्याला त्याचे बायोमेट्रिक्स अपडेट करावे लागतील. यामध्ये हाताची दहा बोटं, डोळ्यांची बुबुळं (Iris) आणि चेहऱ्याच्या फोटोचा समावेश होतो. ब्लू आधारसाठी कसं अप्लाय करावं? » ब्लू आधार कार्ड मिळवण्यासाठी, uidai.gov.in या ऑफिशियल यूआयडी वेबसाईटवर जा. » तिथे आधार कार्ड रजिस्ट्रेशन (Aadhaar Card registration) या ऑप्शनवर क्लिक करा. » तिथे पालकांना अनिवार्य माहिती भरावी लागेल. उदाहरणार्थ, मुलाचं नाव, पालकाचा फोन नंबर आणि मूल व पालकाची इतर बायोमेट्रिक माहितीची नोंद करावी लागेल. » निवासी पत्ता(Residential Address), परिसर, राज्य आणि इतर डेमोग्राफिक डिटेल्स भरा. » वरील सर्व डिटेल्स सबमिट करा. » आधार कार्ड रजिट्रेशनसाठी अपॉईंटमेंट (Appointment) ऑप्शनवर क्लिक करा. » जवळचं नावनोंदणी केंद्र तपासा आणि अपॉईंटमेंट फिक्स करा. आयडेंटीटी प्रूफ, पत्त्यांचा दाखला, रिलेशनशीप प्रूफ, जन्मतारीख आणि रेफरन्स नंबर यासारखे सर्व गरजेचे डॉक्युमेंट्स सोबत घ्या. » सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचं अॅप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी एक पावती क्रमांक (Acknowledgment Number) मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.