जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तीन महिन्यात 50 हजारांची गुंतवणूक 10 लाखांवर; 'या' शेअरमुळे छप्परफाड कमाई!

तीन महिन्यात 50 हजारांची गुंतवणूक 10 लाखांवर; 'या' शेअरमुळे छप्परफाड कमाई!

तीन महिन्यात 50 हजारांची गुंतवणूक 10 लाखांवर; 'या' शेअरमुळे छप्परफाड कमाई!

SEL Manufacturing शेअरची किंमत 3 नोव्हेंबर 2021 रोजी 5.90 रुपये प्रति शेअर होती. आज 3 फेब्रुवारी 2022 रोजी या शेअरची किंमत 129 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 फेब्रुवारी : शेअर बाजारात (Share Market) एखादा चांगल्या स्टॉक शोधून त्यात गुंतवणूक (Investment) केली तर तुम्ही कमी वेळेत जास्त परतावा मिळवू शकता. जर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक्सच्या (Multibagger Stock) शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा स्टॉकबद्दल सांगत आहोत ज्याने केवळ 3 महिन्यांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. SEL Manufacturing असे या स्टॉकचे नाव आहे. या शेअरने केवळ 3 महिन्यांत आपल्या शेअर होल्डर्सना 2086 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तीन महिन्यांत 2086.44 टक्के परतावा गेल्या तीन महिन्यात SEL Manufacturing शेअरच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 5.90 रुपये प्रति शेअर होती. आज 3 फेब्रुवारी 2022 रोजी या शेअरची किंमत 129 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. या शेअरने या कालावधीत 2086.44 टक्के परतावा दिला आहे. काल NSE वर स्टॉक 4.96 टक्क्यांनी वाढला आहे. रिझर्व्ह बँकेकडून ‘या’ बँकेचा परवाना रद्द, खातेधारकांवर काय परिणाम होणार? चेक करा गेल्या 1 वर्षातील शेअर्सच्या किमतीच्या पॅटर्नवर नजर टाकली तर शेअर्सने आश्चर्यकारक परतावा दिला आहे. एका वर्षात या शेअरने 6,192.68 टक्के परतावा दिला आहे. 4 फेब्रुवारी 2021 रोजी या शेअरची किंमत NSE वर फक्त 2.05 रुपये होती आणि आता हा स्टॉक एका वर्षात 29 रुपयांवर पोहोचला आहे. एका महिन्याच्या आत, हा स्टॉक 44.40 रुपयांवरुन (3 जानेवारी रोजी बंद किंमत) 129 पर्यंत वाढला. या कालावधीत या शेअरने आपल्या भागधारकांना 190.54 टक्के परतावा दिला आहे. Tata Group च्या ‘या’ शेअरला ब्रोकरेज फर्मची BUY रेटिंग, Rakesh Jhunjhunwala यांनीही स्टेक वाढवले 3 महिन्यांत 50 हजारांची गुंतवणूक 10.93 लाखांवर जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये तीन महिन्यांपूर्वी 50,000 रुपये गुंतवले असते, तर त्याचे 50 हजार आज 10.93 लाख रुपये झाले असते, तर गेल्या 1 महिन्यात ते 1.45 लाख झाले असते. तर, या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये वर्षभरापूर्वी गुंतवलेली 50 हजारांची रक्कम आज 31.46 लाख रुपये झाली असती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात