मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger Stock : गुंतवणूकदरांची लॉटरी; 'या' स्टॉकमुळे वर्षभरात 1 लाखाचे 1.71 कोटी

Multibagger Stock : गुंतवणूकदरांची लॉटरी; 'या' स्टॉकमुळे वर्षभरात 1 लाखाचे 1.71 कोटी

एका वर्षापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने गोपाला पॉलीप्लास्ट शेअर्समध्ये (Gopala Polyplast Share) 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1.71 कोटी झाले असते. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 ऑक्टोबर : शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे कमावणे वाटतं तितकं सोपं नाही. मात्र असे काही स्टॉक आहेत त्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. गोपाला पॉलीप्लास्ट (Gopala Polyplast Ltd) हा शेअरही यापैकीच एक आहे. एक वर्षापूर्वी हा स्टॉक पेनी स्टॉकमध्ये (Penny Stock) गणला जात होता. मात्र या शेअरने वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना 17000 टक्के रिटर्न दिले आहेत. एक वर्षापूर्वी, 29 ऑक्टोबर 2020 रोजी, गोपाला पॉलीप्लास्टच्या शेअरची किंमत BSE वर 4.51 रुपये होती, जी आज 772 रुपये झाली आहे. 19 ऑक्टोबर 2021 रोजी या शेअरने बीएसईवर 1,286.95 रुपयांचा ऑलटाईन हाय (All Time High) गाठला होता. या कंपनीची मार्केट कॅप सुमारे 790 कोटी रुपये आहे.

एका वर्षापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने गोपाला पॉलीप्लास्ट शेअर्समध्ये (Gopala Polyplast Share) 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1.71 कोटी झाले असते. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत. पण पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक मोठी जोखीम असू शकते, कारण हे शेअर कायम अस्थिर असतात. गोपाला पॉलीप्लास्टच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 11 ट्रेडिंग सत्रांमध्ये 5 टक्के अप्पर सर्किट दिसली. तर तर 9 वेळा तो 5 टक्के लोअर सर्किट आली.

Share Market Update : शेअर बाजारातील पडझडीदरम्यान 'हे' दोन स्टॉक खरेदीचा ब्रोकरेजचा सल्ला

 कंपनीची माहिती

गोपाला पॉलीप्लास्ट कंपनीची स्थापना 1984 मध्ये झाली आणि ती वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी प्लास्टिकच्या वस्तू तयार करते. कंपनी विणलेले पोते आणि विणलेले कापड तयार करते जे धान्य, सिमेंट, रसायने, खते, साखर यांसारख्या उद्योगांमध्ये पॅकेजिंगसाठी वापरले जाते.

शेअरहोल्डिंग

कंपनीवर मुख्यत्वे प्रमोटर्सचे नियंत्रण आहे, ज्यांचे कंपनीत 92.83 टक्के हिस्सेदारी आहे. तर केवळ 7.17 टक्के हिस्सा पब्लिक शेअर होल्डर्सकडे आहे. बँक ऑफ बडोदा ही या कंपनीची सर्वात मोठी सार्वजनिक भागधारक आहे, ज्याकडे कंपनीचे 5 टक्के हिस्सा किंवा 5.12 लाख शेअर्स आहेत. त्याच वेळी, FII कडे 0.23 टक्के हिस्सा आहे.

Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' स्टॉकमध्ये आज 10 टक्के वाढ, खरेदीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

गोपाला पॉलीप्लास्टने जून 2021 च्या तिमाहीत सुमारे 2 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. त्याच वेळी, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1.46 कोटींचा तोटा झाला होता. तथापि, मार्च 2021 च्या तिमाहीत कंपनीला 17 कोटींचा नफा झाला होता. जून 2021 च्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात वाढ झाली आहे, तरीही कंपनी नफा कमवू शकली नाही. BSE फाइलिंगनुसार, कंपनीने जून तिमाहीत 10.59 कोटी रुपयांची कमाई केली, जी कोविड लॉकडाऊनमुळे मागील आर्थिक वर्षाच्या समान तिमाहीत शून्य होती.

First published:

Tags: Investment, Money, Share market