जाहिरात
मराठी बातम्या / मनी / फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखो रुपयांचे रिटर्न

फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखो रुपयांचे रिटर्न

फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखो रुपयांचे रिटर्न

एलआयसीनं आता महिलांसाठी विशेष विमा पॉलिसी आणली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : एलआयसीच्या वतीनं देशातील प्रत्येक वर्गासाठी पॉलिसी उपलब्ध केली जाते. परंतु, आजवर पॉलिसी घेण्यात महिला मागे असल्याचं दिसलं आहे. हिच बाब लक्षात घेऊन एलआयसीनं आता महिलांसाठी विशेष विमा पॉलिसी आणली आहे.

    एलआयसी आधारशीला पॉलिसी असं या पॉलिसीचं नाव असून 8 ते 55 वर्ष वयोगटातील महिला ही पॉलिसी घेण्यासाठी पात्र आहेत. ही पॉलिसी महिलांसाठी अनेकप्रकारे फायदेशीर आहे. यात कमीतकमी 75 हजार रुपये आणि जास्तीतजास्त 3 लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवला जाऊ शकतो.

    पॉलिसीची नेमकी काय आहे योजना?

    एलआयसीच्या या योजनेअंतर्गत तुम्ही तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही कमीतकमी 10 वर्ष आणि जास्तीतजास्त 20 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.

    जर तुम्ही 20 वर्षांसाठी दर महिन्याला 899 रुपये (जवळपास 29 रुपये रोज) जमा करत असाल तर तुम्हाला फक्त 10,959 रुपयेच जमा करावे लागतील. यावर तुम्हाला 4.5 टक्के करही भरावा लागेल.

    पॉलिसीचे असे मिळतील फायदे

    पॉलिसी खेरदी करत असाल तर 20 वर्षांसाठी दर महिन्याला 899 रुपये जमा करावे लागतील. तर 20 वर्षांसाठी एकूण 2 लाख 14 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

    पॉलिसीचा कार्यकाळ संपल्यानंतर म्हणजेच पॉलिसी म्यॅच्युअर झाल्यानंतर 3 लाख 97 हजार रुपये मिळतील. या पॉलिसीत गुंतवणूक करून महिला त्यांचं भविष्य सुरक्षित करू शकतील आणि 20 वर्षांनंतर एकप्रकारे मोठी रक्कम त्यांच्या हाती असेल.

    PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही योजनेचा निधी; काय आहे कारण?

     कोण घेऊ शकतं याचा फायदा

    एलआयसीकडून आधारशीला प्लॅन सिक्युरिटी आणि सेव्हिंग दोन्ही उपलब्ध केलं जातं. ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे केवळ त्याच महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतात. एलआयसीच्या या प्लॅनमध्ये पॉलिसीधारक आणि त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला याची रक्कम दिली जाते.

    अशी आहे योजनेची सविस्तर माहिती

    एलआयसीच्या या योजनेअंतर्गत कमीतकमी विमा रक्कम 75,000 रुपये व जास्तीतजास्त विमा रक्कम 3,00,000 रुपयांपर्यंत आहे. पॉलिसाचा कार्यकाळ 10 ते 20 वर्षांपर्यंत आहे. पॉलिसीचा प्रीमिअम 10 ते 20 वर्षांपर्यंत भरावा लागतो. पॉलिसी मॅच्युरिटीचे जास्तीतजास्त वय 70 वर्षांपर्यंत आहे.

    Leave Encashment म्हणजे काय? EL मधून मिळालेल्या पैशांवर कर भरावा लागतो का?

     दरम्यान, अनेकदा कर वाचवण्यासाठी विविध पॉलिसी काढण्यात येतात. भविष्याचा वेध घेऊन पॉलिसी काढण्याकडेही अनेकांचा कल असतो. एलआयसीने महिलांसाठी सुरू केलेली ही पॉलिसी काढून महिलांना याचा लाभ देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होणंही तितकंच गरजेचं असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: farmer , money
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात