मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँकेत कित्येक वर्ष वाट पाहावी लागली असती; 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे 5 दिवसात डबल!

बँकेत कित्येक वर्ष वाट पाहावी लागली असती; 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे 5 दिवसात डबल!

Bhilwara Spinners शेअरप्रमाणेच, सूरत टेक्सटाईल मिल्स (Surat Textiles Mills) आणि एक्मे रिसोर्सेस (Acme Resources) हे देखील मल्टीबॅगर्स आहेत ज्यांनी गेल्या एका आठवड्यात त्यांच्या शेअर होल्डर्सना उत्कृष्ट परतावा दिला आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 21 डिसेंबर : शेअर बाजार आज हिरव्या रंगात बंद झाला. मात्र गेल्या काही दिवसात शेअर बाजार विक्रीच्या दबावात दिसत आहे. कमकुवत जागतिक संकेत आणि ओमिक्रॉनची दहशत यामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, काही दर्जेदार स्टॉक्स आहेत ज्यांना कमकुवत जागतिक संकेतांचा कमी परिणाम झाला आहे. या शेअर्सनी पडझडीदरम्यानही दमदार कामगिरी केली. भिलवाडा स्पिनर्सचे (Bhilwara Spinners) स्टॉक त्यापैकीच एक आहेत.

बीएसईवर लिस्ट असलेला हा शेअर गेल्या पाच सत्रांमध्ये 21 रुपयांवरून 41.10 रुपयांपर्यंत वाढला आहे, त्यामुळे शेअरहोल्डर्सना 95 टक्के परतावा दिला आहे.

भिलवाडा स्पिनर्स शेअर प्राईज हिस्ट्री

भिलवाडा स्पिनर्स 2021 मधील मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी एक आहे. या शेअरनी गेल्या ट्रेडिंग सत्रांमध्ये अप्पर सर्किट हिट केलं आहे आणि या कालावधीत शेअरने 95 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, BSE वर लिस्ट असलेला हा स्टॉक 19.30 रुपयांवरुन 41.10 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या काळात शेअर सुमारे 115 टक्क्यांनी वधारला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत, स्टॉक 17.25 रुपयांवरून 41.10 रुपयांपर्यंत 140 टक्क्यांनी वाढला आहे.

रोज 100 रुपये गुंतवा आणि बना करोडपती! गुंतवणुकीची सोपी पद्धत तुम्हाला बनवेल श्रीमंत

त्याचप्रमाणे, 2021 मध्ये, हा मल्टीबॅगर स्टॉक 14.90 रुपयांवरून 41.10 रुपयांपर्यंत वाढला आहे आणि या कालावधीत शेअरधारकांना 175 टक्के परतावा दिला आहे.

या दोन शेअर्सनेही चांगला परतावाही दिला

भिलवाडा स्पिनर्सच्या शेअरप्रमाणेच, सूरत टेक्सटाईल मिल्स (Surat Textiles Mills) आणि एक्मे रिसोर्सेस (Acme Resources) हे देखील मल्टीबॅगर्स आहेत ज्यांनी गेल्या एका आठवड्यात त्यांच्या शेअर होल्डर्सना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या एका आठवड्यात सूरत टेक्सटाईल मिल्सचा स्टॉक 67 टक्क्यांनी वाढला आहे, तर Acme रिसोर्सेसचा स्टॉक 60 टक्क्यांनी वाढला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारात मोठी घसरण होऊनही या शेअर्सनी इतका मोठा परतावा दिला आहे.

Multibagger Stock : एक रुपयाच्या स्टॉकची कमाल, वर्षभरात एक लाखाची गुंतवणूक बनली 39 लाख

सुरत टेक्सटाईल मिल्सने गेल्या एका महिन्यात 145 टक्के आणि सहा महिन्यांत 220 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे, Acme Resources चा स्टॉक 2021 मध्ये 9.24 रुपयांवरून 19.44 रुपयांपर्यंत 110 टक्क्यांनी वाढला आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market