मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रोज 100 रुपये गुंतवा आणि बना करोडपती! गुंतवणुकीची सोपी पद्धत तुम्हाला बनवेल श्रीमंत

रोज 100 रुपये गुंतवा आणि बना करोडपती! गुंतवणुकीची सोपी पद्धत तुम्हाला बनवेल श्रीमंत

दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी SIP हा सर्वोत्तम पर्याय आहे. इक्विटी SIP मध्ये, SIP वर 10 टक्के ते 15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता असते. प्रतिदिन 100 रुपये गुंतवून तुम्ही लक्षाधीश कसे बनू शकता ते आता आपण समजून घेऊया.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 21 डिसेंबर : आयुष्यात आर्थिक उद्दिष्टे (Financial Goals) साध्य करण्यासाठी योग्य नियोजन गरजेचं असतं. त्यामुळे वर्तमानात केलेली गुंतवणूक भविष्याती कामी येते. सिस्टमॅटिक इनवेस्टमेंट प्लान (Systematic Investment Plan) असेल तरीही एकाच वेळी मोठी गुंतवणूक करणे सहसा सोपे नसते. पण, जर तुम्हाला सांगण्यात आले की दररोज 100 रुपये गुंतवून तुम्ही करोडपती होऊ शकता, तर तुमचा विश्वास बसणार नाही. समजा तुम्ही नवीन नोकरी सुरू केली आहे आणि गुंतवणूक करण्याची क्षमता खूपच कमी आहे, तर तुम्ही दररोज 100 रुपये गुंतवता. दररोज 100 रुपये गुंतवण्याचा पर्याय खूप स्वस्त आहे. SIP मध्ये मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक आधारावर गुंतवणूक करणे अधिक प्रचलित आहे.

इक्विटी मार्केटशी (Equity Market) संबंधित अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी SIP हा सर्वोत्तम पर्याय आहे. इक्विटी SIP मध्ये, SIP वर 10 टक्के ते 15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता असते. प्रतिदिन 100 रुपये गुंतवून तुम्ही लक्षाधीश कसे बनू शकता ते आता आपण समजून घेऊया.

जगातील पहिल्या मोबाईल SMS चा 2 कोटींना लिलावा होण्याची शक्यता, काय होता 'तो' पहिला मेसेज?

100 रुपये गुंतवून करोडपती कसे व्हायचे

समजा तुम्ही SIP मध्ये दररोज 100 रुपये गुंतवता. तुम्ही ही गुंतवणूक 30 वर्षांसाठी किमान 12 टक्के परतावा मिळण्याच्या अपेक्षेने करता. यानुसार संपूर्ण 30 वर्षात तुम्ही एकूण 10 लाख 95 हजार रुपये गुंतवता. म्युच्युअल फंडाच्या SIP कॅल्क्युलेटरनुसार (Mutual Fund SIP Calculator) तुम्ही 10.95 लाख गुंतवणुकीवर 97.29 लाखांचा परतावा मिळवू शकता. अशा प्रकारे, 30 वर्षांसाठी दररोज 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर, तुम्ही 12 टक्के परताव्याच्या दराने एकूण 1.08 कोटी रुपये कमवू शकता.

Multibagger Stock : एक रुपयाच्या स्टॉकची कमाल, वर्षभरात एक लाखाची गुंतवणूक बनली 39 लाख

SIP म्हणजे काय आणि त्यात गुंतवणुकीचे फायदे काय?

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा म्युच्युअल फंडांकडून गुंतवणूकदारांना ऑफर केलेला एक प्रकारचा प्लान आहे. यामध्ये, एक निश्चित रक्कम पूर्वनिश्चित कालावधीत जमा केली जाते. यामध्ये तुम्ही दरमहा किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीचे अंतर साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक असू शकते. SIP मध्ये गुंतवणुकीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज मिळत जाते. अशा प्रकारे SIP वरील परताव्याची रक्कम तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेपेक्षा जास्त आहे.

First published:

Tags: Investment, Money, Mutual Funds