मुंबई, 31 डिसेंबर : शेअर बाजारात (Share Market) असे अनेक शेअर आहेत ज्यांनी या गुंतवणूकदारांना (Investors) जोरदार परतावा दिला आहे. यातील एक स्टॉक अवंती फीड्सचा (Avanti Feeds) आहे. 8 जानेवारी 2010 रोजी या हैदराबादस्थित कंपनीच्या शेअर्सची किंमत NSE वर 1.63 रुपये होती. त्याच वेळी, 30 डिसेंबर 2021 रोजी या शेअरची किंमत सुमारे 550 रुपये होती. या 12 वर्षांच्या कालावधीत सुमारे 33,650 टक्के परतावा दिला आहे.
अवंती फीड शेअरची प्राईज हिस्ट्री
अवंती फीड्सच्या शेअरच्या किंमतीची प्राईज हिस्ट्री पाहिली तर, 1 महिन्यात या मल्टीबॅगर स्टॉकने (Multibagger Share) सुमारे 5 टक्के परतावा दिला आहे आणि तो 525 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 545.85 रुपयांवरून 550.05 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत 1 टक्क्यांपेक्षा कमी परतावा दिला आहे.
Pension Scheme : EPS ची 15 हजारांची मर्यादा हटणार, लिमीट आता दुप्पट होणार
5 वर्षांत 175 रुपयांवरून 550 रुपये
गेल्या 1 वर्षात या स्टॉकने सुमारे 5 टक्के परतावा दिला आहे परंतु गेल्या 5 वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक 175 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत वाढला आहे आणि या कालावधीत 210 टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या 10 वर्षांत हा स्टॉत 8.18 रुपयांवरुन 550.05 रुपयांवर गेला आहे. या कालावधीत 6600 टक्के परतावा दिला आहे.
तर, गेल्या 12 वर्षांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Penny Stock) 1.63 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्यात 337 पट वाढ झाली आहे. जर आपण या शेअरचा 12 वर्षांचा प्रवास पाहिला, तर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्यात गुंतवणूक करत राहिल्यास 1 लाख रुपये 3.10 लाख रुपये झाले असते.
EPFO चा PF खातेधारकांना मोठा दिलासा! 31 डिसेंबरनंतरही करता येईल E-Nomination
1 लाख रुपये 3.37 कोटी झाले
10 वर्षांपूर्वी जर कुणी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याला 56.50 लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 12 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये 1.63 कोटी रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 3.37 कोटी रुपये झाले असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Share market