मराठी बातम्या /बातम्या /मनी /

गृहकर्जासाठी Cibil Score महत्त्वाचा; सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी 'हे' करा

गृहकर्जासाठी Cibil Score महत्त्वाचा; सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी 'हे' करा

बहुतांश बँका (Banks) किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना ग्राहकाचा सिबिल स्कोअर किमान 750 किंवा त्यापेक्षा अधिक असावा असा आग्रह धरतात. तुम्हाला अपेक्षेइतके गृह कर्ज तेही कमी व्याज दराने हवं असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणं अत्यावश्यक आहे.

बहुतांश बँका (Banks) किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना ग्राहकाचा सिबिल स्कोअर किमान 750 किंवा त्यापेक्षा अधिक असावा असा आग्रह धरतात. तुम्हाला अपेक्षेइतके गृह कर्ज तेही कमी व्याज दराने हवं असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणं अत्यावश्यक आहे.

बहुतांश बँका (Banks) किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना ग्राहकाचा सिबिल स्कोअर किमान 750 किंवा त्यापेक्षा अधिक असावा असा आग्रह धरतात. तुम्हाला अपेक्षेइतके गृह कर्ज तेही कमी व्याज दराने हवं असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणं अत्यावश्यक आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 10 मार्च : घर घ्यायचं असेल किंवा वाहन घ्यायचं असेल किंवा अन्य काही कारणांसाठी आपल्याला कर्ज (Loan) घ्यायचं असेल तर बँका किंवा वित्तीय संस्थांकडून आपला सिबिल स्कोअर (CIBIL Score) तपासला जातो. कर्ज मिळण्यासाठी आपला सिबिल स्कोअर चांगला असावा लागतो. अन्यथा कर्ज मिळणं कठीण होतं. विशेषत: गृहकर्ज (Home loan) घ्यायचं असेल तर सिबिल स्कोअर चांगला असणं महत्त्वाचं असतं. आपला हा स्कोअर चांगला असावा असं तुम्हाला वाटत असेल तर काळजी करू नका. तुम्हाला सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी हे चार उपाय मदत करतील. आज तकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. प्रत्येक ग्राहकाचा सिबिल स्कोअर हा क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (Credit Information Bureau India Limited) ही संस्था निश्चित करते. हा स्कोअर म्हणजे एक तीन अंकी संख्या असते. 300 ते 900 असा हा स्कोअर असतो. 900 स्कोअर असेल तर तो सर्वोत्तम सिबिल स्कोअर मानला जातो. हा स्कोअर तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड कशा पद्धतीने केली आहे, यावर ठरतो. यामध्ये आधी घेतलेल्या कर्जाची परतफेड, बिल भरण्यातील नियमितता आणि आर्थिक स्थिती या निकषांचा समावेश असतो. बहुतांश बँका (Banks) किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना ग्राहकाचा सिबिल स्कोअर किमान 750 किंवा त्यापेक्षा अधिक असावा असा आग्रह धरतात. तुम्हाला अपेक्षेइतके गृह कर्ज तेही कमी व्याज दराने हवं असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणं अत्यावश्यक आहे. थोडक्यात सिबिल स्कोअर म्हणजे कर्ज मिळण्याची गुरुकिल्ली आहे, असं म्हणता येईल. आपला सिबिल स्कोअर चांगला रहावा यासाठी चार गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपलं कर्ज वेळेत फेडा. क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असाल तर त्याचे पेमेंट वेळेत करा. या बाबतीतल्या तुमच्या इतिहासावरून तुम्ही जबाबदार आणि चांगले कर्जदार आहात याची हमी मिळते. यासाठी वेळेत परतफेड केलेल्या कर्जांचे, बिलांचे पुरावे जपून ठेवा. यामुळे बँका किंवा वित्तीय संस्थांना तुमचा कर्जफेडीचा इतिहास जाणून घेण्यास मदत मिळेल आणि तुमचा समावेश कमी जोखमीच्या कर्जदारामध्ये केला जाईल. परिणामी तुम्हाला अपेक्षेइतके आणि कमी व्याजदराने कर्ज मिळेल. कर्जाचं संतुलन (Balance) साधणंदेखील महत्त्वाचं आहे. तुमच्या कर्जांमध्ये सुरक्षित आणि असुरक्षित अशा दोन्ही प्रकारच्या कर्जांचं योग्य संतुलन असणं आवश्यक आहे. तुम्ही घेतलेल्या कर्जांमध्ये असुरक्षित कर्जांचं प्रमाण अधिक असेल तर सिबिल स्कोअरवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्ही कर्जाची, बिलांची नियमित परतफेड करत असलात तरीही तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर (Credit report) लक्ष द्या. त्यामुळे तुमची एखादी चूक किंवा अहवालातील गफलतही लक्षात येऊ शकेल. ग्राहकाला क्रेडिट ब्युरोकडून दरवर्षी संपूर्ण क्रेडिट रिपोर्ट विनामूल्य मिळण्याची सुविधा आहे. या सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि सिबिल स्कोअर अचूक ठेवू शकता. क्रेडीट कार्डच्या बिलांचे वेळेत पेमेंट (Credit Card payment) हा सिबिल स्कोअरमधील एक महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही तुमच्या क्रेडीट कार्डच्या मर्यादेचे किती योग्य पद्धतीने वापर करता हे तपासलं जातं. त्यामुळे या बाबीकडे जरूर लक्ष द्या. एकापेक्षा जास्त क्रेडीट कार्ड्स असणं देखील गृहकर्ज मिळवताना अडचणीचे ठरू शकते. अनेक क्रेडीट कार्ड्स असल्यानं त्याच्या परतफेडीची जबाबदारीही वाढते. तेव्हा गृहकर्ज तुम्हाला हवे आहे तितके आणि कमीत कमी व्याजदराने मिळावे असे वाटत असेल आपला सिबिल स्कोअर चांगला असेल याची काळजी घ्या. त्यासाठी या चार गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. बजाज फायनान्सकडे (Bajaj Finance) तुम्ही कर्जासाठी अर्ज करू इच्छित असाल आणि तुम्ही नोकरदार असाल तर सह कर्जदारासहदेखील अर्ज करू शकता. त्यामुळे तुम्हाला अधिक रकमेचे कर्ज मिळू शकते. तसंच यासाठी सिबिल स्कोअर अपेक्षेपेक्षा कमी असला तरी चालणार आहे. बजाज फायनान्सकडून 6.70 टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते.
First published:

Tags: Credit card, Money

पुढील बातम्या