Home /News /money /

CSK ICICI Bank Credit Card: चेन्नईच्या सामन्यांसाठी मिळेल कॉम्प्लिमेंट्री तिकीट, आणखी बरंच काही; चेक करा फीचर्स

CSK ICICI Bank Credit Card: चेन्नईच्या सामन्यांसाठी मिळेल कॉम्प्लिमेंट्री तिकीट, आणखी बरंच काही; चेक करा फीचर्स

ICICI बँकेने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या भागीदारीत बुधवारी हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले. हे कार्ड सर्व व्यापारी आउटलेटवर किंवा व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या ऑनलाइन वेबसाइटवर वापरले जाऊ शकते.

    मुंबई, 24 मार्च : जर तुम्ही चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) फॅन्स असाल, तर चेन्नई सुपर किंग्सचे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड (Chennai Super Kings ICICI Bank Credit Card) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खरंतर खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या भागीदारीत बुधवारी हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले. हे कार्ड सर्व व्यापारी आउटलेटवर किंवा व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या ऑनलाइन वेबसाइटवर वापरले जाऊ शकते. आयपीएलचा नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी आयसीआयसीआय बँकेने हे क्रेडिट कार्ड जारी केले आहे. चेन्नईच्या चाहत्यांना लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. आयसीआयसीआय बँकेकडून असे सांगण्यात आले की, या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डद्वारे, क्रीडा चाहत्यांना त्यांच्या संघाशी जोडणे शक्य होईल आणि या कार्डवर उपलब्ध असलेल्या फीचर्सचाही लाभ घेता येईल. Bank Strike : महिनाअखेर बँका सलग चार दिवस बंद राहणार, गैरसोय टाळण्यासाठी कामे आधीच करुन घ्या PF Account एक, फायदे अनेक; फ्री इन्शुरन्ससह आणखी काय सुविधा मिळतात? चेक करा कार्डची वैशिष्ट्ये >> क्रेडिट कार्ड ग्राहकांना 2000 रिवॉर्ड पॉइंट्सचे जॉइनिंग आणि रिन्यूअल गिफ्ट मिळेल जे CSK मर्चेंडाईजसह रिडीम केले जाऊ शकतात. >> CSK सामन्यांसाठी कॉम्प्लिमेंट्री तिकिटे. >> सर्वाधिक खर्च करणाऱ्यांना खेळाडूंच्या ऑटोग्राफसह संस्मरणीय वस्तू गोळा करण्याची संधी. >> निवडक खेळाडूंना भेटण्याची संधी. >> सांघिक सराव सत्रात सहभागी होण्याची संधी. >> चेन्नई सुपर किंग्ज सामन्याच्या दिवसांमध्ये सर्व किरकोळ खर्चावर 10 रिवॉर्ड पॉइंट. >> इतर दिवशी सर्व किरकोळ खर्चावर 2 रिवॉर्ड पॉइंट. >> देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये कॉम्प्लिमेंट्री अॅक्सेसी सुविधा. >> HPCL इंधन केंद्रांवर 1 टक्के इंधन सरचार्ज लागणार नाही. >> हे कार्ड कॉन्टॅक्टलेस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे ग्राहकांना 'टॅप अँड पे' ची सुविधा देखील देते म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त POS मशीनवर टॅप करून पेमेंट करता येते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Credit card, Csk, Icici bank, Ipl 2022

    पुढील बातम्या