मुंबई, 5 जून : शेअर बाजारात (Share Market) अनेक शेअर्स आहेत ज्यांनी कमी गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे. आज अशाच एका शेअरबद्दल तुम्हाला सांगत आहोत. स्मॉल कॅप कंपनी साधना ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या स्टॉकने (Sadhna Broadcast Ltd) गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 88 कोटी रुपये मिंटमधील वृत्तानुसार, मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड या कंपनीचे मार्केट कॅप 88 कोटी रुपये आहे. अलीकडे, 31 मे 2022 रोजी, कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटसााठी 13 जून 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. शुक्रवारी (3 जून) कंपनीचा शेअर 88.25 रुपयांवर बंद झाला. एका वर्षात गुंतवणूकदारांना 700 टक्क्यांहून अधिक परतावा जर आपण या शेअरची प्राईज हिस्ट्री पाहिली तर या कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात 52 आठवड्यांचा उच्चांक आणि इंट्राडे 88.25 (5 टक्के) पातळी गाठली होती. कंपनीचा शेअर 4 जून 2021 रोजी 11 रुपयांवरून 3 जून 2022 रोजी दुपारी 3:30 वाजता 88.25 रुपयांपर्यंत वाढला. गेल्या एका वर्षात या शेअरने 702.27 टक्के परतावा दिला आहे. एका महिन्यात 35 रुपये 88 रुपये झाले कंपनीच्या स्टॉकने यावर्षी आतापर्यंत 321 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरने जवळपास 153 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत साधना ब्रॉडकास्टचा शेअर 35 रुपयांवरून 88.25 रुपयांपर्यंत वाढला आहे. मालमत्ता 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर का दिली जाते? मग मालकी कुणाकडे राहते? कैसर कॉर्पोरेशन (Kaiser Corporation) या कंपनीचे 2 विभाग आहेत. यात प्लास्टिक विभाग आहे ज्यामध्ये प्लास्टिकचे कंटेनर तयार केले जातात. तर दुसरा विभाग प्रिटिंगचा आहे, जिथे क्वालिटी प्रिटिंग, मॅन्युफॅक्चरिंग तसेच कार्टन्स बनवले जातात. या वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे 3 जानेवारीला हा स्टॉक 2.92 रुपयांवर होता, जो आता वाढून 83.40 रुपये झाला आहे. यावर्षी ज्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, त्यांची रक्कम 28.56 लाख रुपये झाली असेल. या 5 महिन्यांत या स्टॉकने 2756 टक्के परतावा दिला आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये हा शेअर 52 आठवड्यांचा उच्चांक 130 रुपयांवर पोहोचला होता. Personal Loan: झटपट मिळणाऱ्या वैयक्तिक कर्जासाठी पात्रता-अटी; व्याजदरासाठी कोणते घटक महत्त्वाचे ठरतात? गॅलोप्स एंटरप्रायजेस (Gallops Enterprises) रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित ही कंपनी आहे. कंपनी बांधकाम, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट आणि इंजिनीअरिंग सर्व्हिसेस पुरवते. यावर्षी हा शेअर 4.78 रुपयांवरून 57.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. या दरम्यान, स्टॉक 1094 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये जर एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता त्याची रक्कम 11.94 लाख रुपये झाली असती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.