Home /News /money /

Personal Loan: झटपट मिळणाऱ्या वैयक्तिक कर्जासाठी पात्रता-अटी; व्याजदरासाठी कोणते घटक महत्त्वाचे ठरतात?

Personal Loan: झटपट मिळणाऱ्या वैयक्तिक कर्जासाठी पात्रता-अटी; व्याजदरासाठी कोणते घटक महत्त्वाचे ठरतात?

पर्सनल लोनचे व्याजदर ठरवताना तुम्ही कुठे काम करता, कोणते काम करता हेही पाहिले जाते. नामांकित संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना तुलनेने लवकर आणि चांगल्या व्याजदरात कर्ज मिळते.

    मुंबई, 5 जून : वैयक्तिक कर्ज (Personal Loan) काही मिनिटामध्ये तुमच्या बँक अकाऊंटमध्ये (Bank Account) जमा होतं. त्यामुळे अडचणीच्या काळाता वैयक्तिक कर्ज मोठा आधार असते. हे एक असं कर्ज आहे ज्यासाठी अनेक मोठ्या मालमत्ता गहाण ठेवण्याची किंवा हमी देण्याची गरज नाही. बँक काही गोष्टी आणि कर्ज फेडण्याची तुमची क्षमता पाहून कर्ज देते. मात्र काही आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता आहेत जी वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक आहेत, यावर एक नजर टाकूया. वैयक्तिक कर्ज पात्रता-अटी >> वय: अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 60 वर्षे असावे. >> क्रेडिट स्कोअर: 750 किंवा त्याहून जास्त असावा. >> पगार: किमान पगार 15000 रुपये दरमहा असावा. >> स्थिर रोजगार: एकूण 2 वर्षांचा कामाचा अनुभव ज्यापैकी 1 वर्ष एकाच कंपनीत असावा आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींनी किमान 2 वर्षे एकाच व्यवसायात असावे. >> नोकरीचा प्रकार: नामांकित संस्था, MNC, खाजगी आणि सार्वजनिक मर्यादित कंपन्या, सरकारी संस्था, PSU मध्ये काम करणाऱ्या व्यक्ती. मालमत्ता 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर का दिली जाते? मग मालकी कुणाकडे राहते? वैयक्तिक कर्जाचे व्याजदर तसे जास्त आहेत. वेगवेगळ्या बँकांचे व्याजदरही वेगवेगळे असतात. अनेकदा वैयक्तिक कर्जाचे व्याज अनेक घटकांवर अवलंबून असते. एकच बँक वेगवेगळ्या व्याजदराने कर्ज देऊ शकते. आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत की बँक कोणत्या घटकांच्या आधारे वैयक्तिक कर्जाचे व्याजदर ठरवते. तुमचा क्रेडिट स्कोअर क्रेडिट स्कोअर (Credit Score) एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक कर्ज देण्यामधील जोखीम दर्शवते. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, अधिक जोखीम मानत बँक कर्जावर (Bank Loan) जास्त व्याजदर देखील लागू करेल. म्हणून, 750 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर राखण्याचा सल्ला दिला जातो. तुमचे मासिक उत्पन्न ज्या अर्जदाराचे उत्पन्न जास्त आहे तो कर्जाची वेळेवर परतफेड करू शकेल असा बँकांचा विश्वास आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांना वैयक्तिक कर्ज जलद आणि कमी दरात मिळू शकते. Post Office Scheme: पैसे सुरक्षित आणि व्याजदरही जास्त; पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये करा गुंतवणूक तुम्ही कुठे काम करता पर्सनल लोनचे व्याजदर ठरवताना तुम्ही कुठे काम करता, कोणते काम करता हेही पाहिले जाते. नामांकित संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना तुलनेने लवकर आणि चांगल्या व्याजदरात कर्ज मिळते. सरकारी नोकर्‍या करणार्‍या लोकांना त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेमुळे चांगल्या व्याजदरावर वैयक्तिक कर्ज देखील मिळते. बँकेशी तुमचे नाते तुमचे कोणत्याही बँकेशी चांगले आणि जुने संबंध असल्यास आणि तुम्ही आधीच कर्जाची रक्कम वेळेवर भरली असेल, तर बँक तुम्हाला इतरांच्या तुलनेत सुलभ अटी आणि कमी व्याजदरावर कर्ज देऊ शकते. बँकेचे विद्यमान ग्राहक देखील प्री अप्रुव्ह कर्ज ऑफर मिळवू शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Loan, Money, Personal finance

    पुढील बातम्या