जाहिरात
मराठी बातम्या / मनी / मालमत्ता 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर का दिली जाते? मग मालकी कुणाकडे राहते?

मालमत्ता 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर का दिली जाते? मग मालकी कुणाकडे राहते?

मालमत्ता 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर का दिली जाते? मग मालकी कुणाकडे राहते?

सहसा भाडेपट्ट्याचा कालावधी संपल्यानंतर, काही रक्कम भरल्यावर सरकार लीज्ड मालमत्तेचे फ्रीहोल्डमध्ये रूपांतर करण्यास परवानगी देते. किंवा दुसरी लीज खरेदी करण्याचा अधिकार प्रदान करते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जून : अनेकदा आपण ऐकतो की एखाद्याने 99 वर्षांच्या भाडेतत्वावर प्रॉपर्टी (99 year leased property) घेतली. मात्र अनेकांना प्रश्न पडत असेल की 99 वर्ष भाडेतत्वांवर म्हणजे नेमकं काय? तर याबद्दल थोडं जाणून घेऊयात. मालमत्ता दोन प्रकारच्या असतात एक फ्रीहोल्ड (Free Hold Property)आणि लीज्ड (Leased Property). फ्री होल्ड मालमत्तेवर मालकाशिवाय कोणाचाही अधिकार नाही. तर भाडेतत्त्वावरील मालमत्ता बांधकाम झाल्यापासून 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिल्या जातात. लीज कालावधी संपल्यानंतर किंवा नूतनीकरणाच्या बाबतीत मालमत्तेची मालकी कोणाकडे असते? याबाबत माहिती घेऊ. विकास प्राधिकरण बिल्डरांना जमीन विकसित करण्यासाठी आणि मालमत्ता 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्याचे अधिकार देते. याचा अर्थ जो कोणी निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करेल, त्याला त्यावर 99 वर्षांचा हक्क असेल. त्यानंतर हा अधिकार जमिनीच्या मालकाकडे येईल. भाडेतत्त्वावरील मालमत्तांच्या ग्राहकांना जमिनीचे भाडे मालकाला द्यावे लागते. कालावधी संपल्यानंतर या मालमत्तांचे नूतनीकरण देखील केले जाऊ शकते. Post Office Scheme: पैसे सुरक्षित आणि व्याजदरही जास्त; पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक लीज संपल्यानंतर? सहसा भाडेपट्ट्याचा कालावधी संपल्यानंतर, काही रक्कम भरल्यावर सरकार लीज्ड मालमत्तेचे फ्रीहोल्डमध्ये रूपांतर करण्यास परवानगी देते. किंवा दुसरी लीज खरेदी करण्याचा अधिकार प्रदान करते. जुने घर खरेदी करताना जर एखाद्या गुंतवणूकदाराची 30 वर्षे जुन्या लीज्ड मालमत्तेवर नजर असेल, तर त्याला ती पुढे विकणे कठीण होऊ शकते, कारण संभाव्य खरेदीदारांसाठी वित्तपुरवठा करणे सोपे होणार नाही. लीज संपल्यानंतर ऑक्युपन्सी कॉन्ट्रॅक्ट मिळवणे हे खरेदीदारासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. नूतनीकरणाव्यतिरिक्त, जुन्या मालमत्तांवर मालमत्ता करासारखा अतिरिक्त खर्च देखील होतो. खरेदीदाराला प्रॉपर्टी टायटल आणि रजिस्ट्रेशन पेपर ट्रान्सफर करण्यात समस्या येऊ शकतात. दुसरीकडे, लीजवर दिलेल्या मालमत्तेच्या वंशजांचा त्यावर 99 वर्षांचा अधिकार असल्यास, त्यांना फक्त लीज नूतनीकरणाची रक्कम भरावी लागेल. दुसरीकडे, बांधकाम व्यावसायिकांना असे वाटते की जे प्रकल्प कमी कालावधीसाठी भाडेतत्त्वावर दिले जातात त्यांना बांधकाम निधी मिळत नाही, ज्यामुळे कामास विलंब होऊ शकतो किंवा बांधकाम थांबू शकते. UPI पेमेंट फेल होऊन पैसे अडकल्यास तात्काळ मदत मिळणार, बँकेला फोन करण्याचीही गरज नाही 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर का? मालक आणि ग्राहक यांच्यात ठराविक रकमेसाठी करार असतो. त्यामध्ये मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी दोघांचे हक्क आणि कर्तव्ये नमूद असतात. अटी आणि शर्ती करारामध्ये लिहिलेल्या असतात, ज्यामध्ये अधिकारांचे स्वरूप, लीजचा कालावधी, मालक आणि ग्राहक यांची कर्तव्ये, अटी, समाप्ती खंड आणि विवाद निपटारा यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळात, याला सुरक्षित कालावधीसाठी एक पर्याय म्हणून पाहिले जात होते, जे लीज लाइफ कव्हर करते. तसेच, मालमत्तेच्या मालकीचे संरक्षण करण्यासाठी हा योग्य कालावधी मानला गेला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात