मुंबई, 18 सप्टेंबर : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी योग्य कंपनीत दीर्घकाळ संयम ठेवला तर ते भरपूर पैसे कमवू शकतात. Astral Ltd च्या शेअरने हे सिद्ध केले आहे आणि गेल्या 15 वर्षांत मल्टीबॅगर परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना लखपती ते करोडपती बनवले आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 400 पेक्षा जास्त वेळा वाढली आहे. Astral Ltd चे शेअर्स शुक्रवारी 16 सप्टेंबर रोजी NSE वर 2,347 रुपयांवर बंद झाले. तर 23 मार्च 2007 रोजी NSE वर ट्रेडिंग सुरू झाला तेव्हा त्याच्या शेअर्सची किंमत फक्त 5.57 रुपये होती. अशाप्रकारे, गेल्या 25 वर्षात त्याच्या शेअर्सची किंमत सुमारे 42,050 टक्क्यांनी वाढली आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने जर 23 मार्च 2007 रोजी Astral Ltd च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपयांचे मूल्य 4.21 कोटी रुपये झाले असते. दुसरीकडे, एखाद्या गुंतवणूकदाराने त्या दिवशी केवळ 25 हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या 25 हजार रुपयांचे मूल्यही 1 कोटी 5 लाख रुपये झाले असते. ITR Refund: आयकर परतावा अजून आला नाही तर काय कारणं असू शकतात? चेक करा सद्यस्थिती अॅस्ट्रल लिमिटेडचा शेअर गेल्या एका महिन्यात जवळपास 15 टक्क्यांनी वाढला आहे. तर गेल्या वर्षभरात त्याची किंमत 13.75 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी गेल्या 5 वर्षात त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 433.63 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी एस्ट्रल लिमिटेडच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख रुपयांचे मूल्य आज 5.33 लाख रुपये झाले असते. Senior Citizen Saving Scheme: ‘या’ बचत योजनेद्वारे दरवर्षी होऊ शकते 2 लाखांची कमाई, समजून घ्या सविस्तर एस्ट्रल लिमिटेड 47.13 हजार कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह लार्जकॅप शेअर आहे. ही भारतातील CPVC पाईप्स आणि फिटिंग्ज बनवणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. Astral ने जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 28 टक्क्यांनी वाढ नोंदवून ती 96 कोटी रुपये इतकी नोंदवली आहे जी गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 75 कोटी रुपये होती. कंपनीचा एकत्रित महसूल 73 टक्क्यांनी वाढून 1,213 कोटी झाला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 701 कोटी होता. तर एकूण खर्च 81.15 टक्क्यांनी वाढून 1,098 कोटी रुपये झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.