मुंबई, 18 सप्टेंबर : आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलैपर्यंत आयटीआर भरला, पण अजूनही तुम्हाला तुमचा आयकर परतावा मिळाला नसेल, तर याची अनेक कारणे असू शकतात. आयकर विभागाने 8 सप्टेंबरपर्यंत 2 कोटींहून अधिक करदात्यांना 1.19 लाख कोटी रुपयांचा आयकर परतावा जारी केला आहे. तुम्हाल अद्याप आयकर परतावा मिळाला नसेल तर तो मिळवण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती घेऊयात. सर्वप्रथम तुम्हाला आयटीआर प्रक्रिया तपासावी लागेल की आयकर विभागाने तुमचा आयटीआर फॉरवर्ड केला आहे की नाही. कारण जेव्हा कर विभाग तुमच्या पात्रतेची पुष्टी करेल तेव्हाच तुम्हाला परतावा मिळेल.
आयकर परतावा स्थिती तपासा तुमचा आयटीआर टॅक्स विभागाने फॉरवर्ड केला आणि कन्फर्म केला असेल, मात्र तुम्हाला अद्याप परतावा मिळाला नसेल, तर तुम्हाला तुमची आयकर परताव्याची स्थिती तपासण्याची आवश्यकता आहे. हे तपासण्यासाठी, अधिकृत वेबसाइट https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.htmle च्या लिंकवर जावे लागेल आणि विनंती केलेली माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आयकर परतावा न मिळण्याचे एक कारण म्हणजे बँक खात्याच्या प्री वॅलिडेशनमधील त्रुटी. याशिवाय पॅनकार्ड बँक खात्याशी लिंक न करण्याचेही कारण असू शकते. प्री-व्हॅलिडेशन चेक करण्यासाठी, तुम्हाला आयकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि माय प्रोफाइलमधील बँक खाते पर्याय निवडून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. गूगलच्या चुकीमुळे व्यक्ती रातोरात बनला करोडपती, खात्यात अचानक जमा झाली मोठी रक्कम; पुढे काय झालं? जर तुम्ही आधीच्या ITR साठी मागितलेली माहिती दिली नसेल, जी आयकर विभागाने तुम्हाला नोटीस पाठवून मागितली असेल. या परिस्थितीत, तुमचा आयकर परतावा यावेळी जारी केला जाणार नाही. त्यामुळे मागील आर्थिक वर्षासाठी मागितलेली कोणतीही माहिती यापुढे प्रलंबित राहणार नाही याची तुम्हाला खात्री करावी लागेल.