मुंबई, 18 सप्टेंबर: ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच ACSS ही ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाणारी सर्वोत्तम योजना आहे. या योजनेत सध्या ७.४ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. बचत खात्याच्या व्याजदराबाबत हीच गोष्ट पाहिली तर तेथे तुलनेनं खूपच कमी व्याजदर मिळतो. बचत खात्यावरील व्याज 2.5-3 टक्क्यांपासून सुरू होते आणि ते साडेसहा टक्क्यांपर्यंत जाते. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही महागाईच्या काळात अतिशय चांगली ठेव योजना आहे. तिचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही योजना सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना हमी परतावा देते. त्यानुसार पोस्ट ऑफिसमध्ये चालवण्यात येणारी ही योजना अनेक प्रकारे फायदे देणार आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना किंवा SCSS ही एक सरकार समर्थित योजना आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नाही आणि पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे चालविली जाऊ शकते. ही योजना सेवानिवृत्त लोकांना परताव्याची हमी देते आणि या योजनेत गुंतवणूक करून, एक ज्येष्ठ नागरिक वार्षिक 2 लाखांपेक्षा जास्त कमावू शकतो. कसं ते जाणून घेऊया. 5 वर्षांसाठी 15 लाख जमा करता येतात: 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही नागरिक SCSS योजना उघडू शकतो. खाते उघडताना 1000 रुपयांच्या पटीत पैसे जमा करावे लागतील आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतील. या योजनेचा लॉक इन कालावधी 5 वर्षांचा आहे. सध्याच्या 7.4 टक्क्यांनुसार, एखाद्या व्यक्तीने SCSS मध्ये 5 वर्षांसाठी 15 लाख रुपये गुंतवले, तर त्याला मोठा परतावा मिळू शकतो. हा परतावा नेमका किती असू शकतो हे आपण पाहूया. दर तिमाहीला मिळेल 27750 रुपये व्याज: 15 लाख रुपये जमा केल्यावर 7.4 टक्के व्याज दरानं प्रत्येक तिमाहीत 27,750 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच वार्षिक व्याज साधारणपणे 111,000 रुपये असेल. अशा प्रकारे, खात्याच्या मॅच्युरिटीवर, खातेदाराला एकूण 5,55,000 रुपये व्याज म्हणून मिळतील. SCSS खात्यावर दर तिमाहीत व्याज मिळतं आणि त्याचे दर दरवर्षी 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी लागू होतात. खाते उघडण्याच्या दिवशी योजनेचा व्याजदर जो असेल, तोच दर पुढील पाच वर्षांसाठी लागू होईल. हेही वाचा: PM Suraksha Bima Yojana: दरमहा फक्त 1 रुपये जमा करा, सरकार देईल 2 लाख रुपयांचा लाभ संयुक्त ठेवीचा फायदा: ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये संयुक्त ठेव किंवा संयुक्त खाते उघडण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्नीसोबत हे खातं उघडू शकतात. संयुक्त खात्याच्या बाबतीत, पती-पत्नीची एकत्रित ठेव रक्कम 30 लाख रुपये (प्रति ठेवीदार 15 लाख) असेल. अशा प्रकारे या दोन्ही ठेवीदारांना वर्षात 111,000 च्या दुप्पट म्हणजेच 222,000 रुपये मिळतील. वर आम्ही स्पष्ट केलं आहे की एका ठेवीदाराला एका वर्षात रु. 111,000 व्याज मिळते. अशाप्रकारे, पती-पत्नीनं मिळून प्रत्येकी 15 लाख रुपये ज्येष्ठ नागरिक योजनेत गुंतवले तर त्यांना वर्षाला 222,000 रुपये सहज मिळतील. जर ज्येष्ठ नागरिक पती-पत्नींना मुदतपूर्तीनंतर त्यांचे पैसे काढायचे असतील तर त्यांना 41,10,000 रुपये मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.