मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांचा या स्टॉकमुळे 753 कोटींचा तोटा, तुमच्याकडेही आहे हा शेअर?

Rakesh Jhunjhunwala यांचा या स्टॉकमुळे 753 कोटींचा तोटा, तुमच्याकडेही आहे हा शेअर?

आश्चर्यकारक वेगाने उच्चांकावर पोहोचलेल्या भारतीय शेअर बाजारातल्या (Indian Share Market Update) तेजीला काही दिवसांपूर्वी लगाम लागला होता. त्यातच काल (26 नोव्हेंबर) आठवड्याच्या कामकाजाचा शेवटचा दिवस असलेल्या शुक्रवारी (Friday Share Market fall) शेअर बाजारात जबरदस्त घसरण झाली

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: आश्चर्यकारक वेगाने उच्चांकावर पोहोचलेल्या भारतीय शेअर बाजारातल्या (Indian Share Market Update) तेजीला काही दिवसांपूर्वी लगाम लागला होता. त्यातच काल (26 नोव्हेंबर) आठवड्याच्या कामकाजाचा शेवटचा दिवस असलेल्या शुक्रवारी (Friday Share Market fall) शेअर बाजारात जबरदस्त घसरण झाली. कोरोना विषाणूचा नवीन व्हॅरिएंट आढळल्याच्या बातमीने आणि अन्य घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात (International Stock Markets) घसरण झाली. त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) तब्बल 1600 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 509 अंकांनी कोसळला. यामुळे अवघ्या दोन तासांत गुंतवणूकदारांचं 6.50 लाख कोटींचं नुकसान झालं. कालचा शुक्रवार गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक फ्रायडे (Black Friday) ठरला.

शेअर बाजारातल्या या घसरणीचा फटका बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Zunzunwala Shares) यांनाही बसला. त्यांच्या आवडत्या टायटन कंपनीचा शेअर शुक्रवारी सुमारे 4.37 टक्क्यांनी घसरला. या संपूर्ण आठवड्यात त्यात 7 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. या घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांचं सुमारे 753 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

हे वाचा-31 मार्चपर्यंत मिळेल मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ, वाचा काय आहे प्रक्रिया

राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Zunzunwala Shares) यांच्याकडे टाटा समूहाच्या या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात आहेत. राकेश झुनझुनवाला (Rakesh Zunzunwala Portfolio) आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे एकूण 4 कोटी 33 लाख 970 शेअर्स आहेत. कंपनीच्या एकूण शेअर्सचा हा 4.87 टक्के हिस्सा आहे. जुलै ते सप्टेंबर 2021 या तिमाहीसाठी टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 3 कोटी 37 लाख 60 हजार 395 शेअर्स आहेत. त्यांचं प्रमाण कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 3.80 टक्के आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 95 लाख 40 हजार 575 शेअर्स म्हणजेच 1.07 टक्के शेअर्स आहेत.

हे वाचा-SBI ला मोठा झटका! RBI ने ठोठावला 1 कोटी रुपयांचा दंड, हे आहे कारण

गेल्या आठवडाभरात टायटन कंपनीचा शेअर 2467 रुपयांवरून 2293 रुपयांपर्यंत घसरला. या काळात प्रति शेअर 174 रुपये किंवा सुमारे 7 टक्के तोटा झाला. प्रत्येकी 174 रुपये तोटा याप्रमाणे 4 कोटी 33 लाख 970 शेअर्समागे राकेश झुनझुनवाला यांना अंदाजे 753 कोटी रुपये इतका निव्वळ तोटा झाला आहे. राकेश झुनझुनवाला जे शेअर्स घेतात त्यात चांगला फायदा होतो असं मानलं जातं. त्यामुळे ते ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात ते शेअर्स घेण्याला सर्वसामान्य गुंतवणूकदार प्राधान्य देतात. त्यामुळे टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाही (Investors) काल तोटा सहन करावा लागला आहे.

First published: