Home /News /money /

₹19 चा स्टॉक पोहोचला 494 रुपयांवर! 6 महिन्यातच गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का हा शेअर?

₹19 चा स्टॉक पोहोचला 494 रुपयांवर! 6 महिन्यातच गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का हा शेअर?

रघुवीर सिंथेटिक्सच्या (Raghuvir Synthetics Share Price) या स्टॉकने गेल्या सहा महिन्यात शेअरधारकांना 2,455% रिटर्न दिला आहे. हा पेनी स्टॉक यावर्षी 4 जून 2021 रोजी 19.33 रुपयांवर होता.

    मुंबई, 07 डिसेंबर: शेअर बाजारातील गुंतवणूक जरी जोखीमपूर्ण असली तरी असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना काही काळातच मालामाल केले आहे. काही पेनी स्टॉक्स देखील अशाच शेअर्सपैकी आहेत. तुम्ही देखील पेनी स्टॉक (Penny Stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. शेअर बाजारात अनेक गुंतवणूकदारांना ठराविक पेनी स्टॉक्सनी जबरदस्त रिटर्न (investment return) दिला आहे. ज्या स्टॉक्सची मार्केट व्हॅल्यू अत्यंत कमी असते त्यांना पेनी स्टॉक्स (What is penny stock) असे म्हणतात. शक्यतो या स्टॉक्सची किंमत 25 रुपयांपेक्षा कमी असते. दरम्यान आज आम्ही तुम्हाला रघुवीर सिंथेटिक्स (Raghuvir Synthetics) च्या स्टॉक्सबाबत सांगणार आहोत. ₹19 चा स्टॉक पोहोचला 494 रुपयांवर रघुवीर सिंथेटिक्सच्या (Raghuvir Synthetics Share Price) या स्टॉकने गेल्या सहा महिन्यात शेअरधारकांना 2,455% रिटर्न दिला आहे. हा पेनी स्टॉक यावर्षी 4 जून 2021 रोजी 19.33 रुपयांवर होता. सोमवारी या स्टॉकची किंमत बीएसईवर 52 आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवर अर्थात 494.05 रुपयांवर पोहोचली होती. हे वाचा-Gold Price Today: लग्नसराईत उतरला सोन्याचांदीचा भाव,आज या दराने खरेदी करा गोल्ड 6 महिन्यांत लाखाचे झाले 25 लाख सहा महिन्यांपूर्वी जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर ते आज 25.55 लाख रुपये झाले आहेत. गेल्या 21 सत्रांमध्ये स्मॉल कॅप स्टॉकमध्ये 177.79% ची तेजी आली आहे. हा शेअर 4.99% वाढीसह 494.05 रुपयांवर उघडला आहे. जाणून घ्या कंपनीबद्दल सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीपर्यंत कंपनीच्या चार प्रमोटर्सकडे 74.91% स्टेक किंवा 29.02 लाख शेअर्स आहेत. तर  3,831 सार्वजनिक शेअरहोल्डर्सकडे 25.09% स्टेक किंवा 9.72 लाख शेअर्स आहेत. मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात या फर्मने मार्च 2020 आर्थिक वर्षातील नफ्यात 137.50% वाढ नोंदवली. हे वाचा-'या' शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan चा 10वा हप्ता, मोदी सरकारने जारी केली यादी गेल्या सहा महिन्यांत रघुवीर सिंथेटिक्सच्या शेअरने बाजारातील रिटर्नच्या बाबतीत त्याच्या प्रतिस्पर्धींना मागे टाकले आहे. रघुवीर सिंथेटिक्स ही सर्वात मोठी टेक्सटाइल प्रोसेसिंग कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये बेड लिनन्स/बेडिंग, पडदे, टॉवेल, किचन उत्पादने, अपहोल्स्ट्री रंग आणि 100% कॉटन पॅच वर्क आणि रजाई यांचा समावेश आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या