नवी दिल्ली, 07 डिसेंबर: सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे आणि सोनचांदीची (Gold and Silver Rate on 07th December) मागणीही वाढली आहे. दरम्यान सोनखरेदी करणाऱ्यांसाठी आज (Investment in Gold) खूशखबर आहे. आज 7 डिसेंबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर, फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी फ्यूचर गोल्डची किंमत (Gold Rate Today) आज 0.05 टक्क्यांनी घसरली आहे, तर चांदीचे भाव 0.8 टक्क्यांनी (Silver Rate Today) घसरले. अशा परिस्थितीत तुम्ही या मौल्यवान धातूंची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.
रेकॉर्ड हायपेक्षा 8310 रुपयांनी स्वस्त
2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Price Today) 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. आज एमसीएक्सवर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा दर 47,890 रुपये प्रति तोळा आहे, म्हणजेच आज सोन्याचा दर सुमारे 8310 रुपयांनी कमी आहे.
हे वाचा-Petrol Price Today: आज पेट्रोल महागलं की स्वस्त झालं? वाचा इंधनाचा लेटेस्ट भाव
जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव
फेब्रुवारी 2022 च्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.05 टक्क्यांनी घसरून 47,890 रुपये प्रति तोळावर आहे. त्याच वेळी, आजच्या व्यवहारात चांदी 0.8 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव (Silver Price Today) 61,221 रुपये आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
हे वाचा-टेक्नॉलॉजी फंड्सनी दिलाय जबरदस्त रिटर्न! गुंतवणुकीआधी जाणून घ्या यातील रिस्क
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today