मुंबई, 9 जानेवारी : कोरोना महामारीच्या कहरातून सावरलेल्या शेअर बाजाराने गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 2021 मध्ये, भारतीय शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉकची (Multibagger Stocks) संख्या मोठी होती. मल्टीबॅगर स्टॉक्सच्या या यादीमध्ये सर्व विभागातील स्टॉकचा समावेश आहे. 2021 हे वर्ष लहान आणि पेनी स्टॉक्ससाठीही (What is penny stocks) उत्तम ठरले कारण या बाजारातील रॅलीने हे सिद्ध केले आहे की पेनी स्टॉकमधील गुंतवणूक सामान्यपेक्षा जास्त परतावा देऊ शकते. परंतु कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत असणे गरजेचं आहे. लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीज हा (Lloyds Steels Industries) देखील असाच एक स्टॉक आहे ज्याने मागील वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. हा मेटल स्टॉक जानेवारी 2020 मध्ये 0.50 रुपयांवरून 24.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. या दोन वर्षांत या स्टॉकमध्ये सुमारे 4900 टक्के वाढ झाली आहे. Edelweiss ची ‘या’ टेक्सटाईल शेअरला BUY रेटिंग, मागील सहा महिन्यात पैसे दुप्पट, आता काय असेल टार्गेट? लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीज शेअर्सची किंमत गेल्या एका आठवड्यात हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 20.65 रुपयांवरून 24.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. यामुळे लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांना सुमारे 21 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या एका महिन्यात, पेनी स्टॉकने 10.80 ते 24.95 रुपये अशी पातळी गाठल्यानंतर भागधारकांना सुमारे 130 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 3.45 रुपयांवरून 24.95 रुपये प्रति शेअर झाली आहे. या कालावधीत स्टॉक सुमारे 625 टक्के वाढला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 1 रुपये प्रति शेअर वरून 24.95 रुपये प्रति शेअर इतका वाढला आहे. या कालावधीत सुमारे 2400 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या दोन वर्षांत मल्टीबॅगर पेनी स्टॉक 0.50 रुपयांवरून 24.95 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो या काळात सुमारे 4900 टक्के आहे. Cashback on LPG : घरगुती सिलेंडरवर मिळवा कॅशबॅक, या अॅपवरुन करा बुकिंग 1 लाख बनले असते 25 लाख जर आपण लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या शेअरची प्राईज हिस्ट्री पाहिली तर, नवीन वर्ष 2022 च्या सुरुवातीला जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे आजचे 1 लाख रुपये 1.21 लाख झाले आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 2.30 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 25 लाख झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 0.50 च्या पातळीवर 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख आज सुमारे 50 लाख रुपये झाले असते. (Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.