Home /News /money /

Cashback on LPG : घरगुती सिलेंडरवर मिळवा कॅशबॅक, या अॅपवरुन करा बुकिंग

Cashback on LPG : घरगुती सिलेंडरवर मिळवा कॅशबॅक, या अॅपवरुन करा बुकिंग

तुम्हाला 14.2 किलो गॅस सिलेंडरवर निश्चित कॅशबॅक (Cashback on LPG) मिळू शकतो. खरंतर, पॉकेट्स अॅपद्वारे गॅस सिलिंडर बुक केल्यावर ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.

    मुंबई, 8 जानेवारी : वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. बर्‍याच गोष्टींप्रमाणेच घरगुती सिलेंडर म्हणजेच एलपीजीच्या किमतीतही सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तुम्हाला 14.2 किलो गॅस सिलेंडरवर निश्चित कॅशबॅक (Cashback on LPG) मिळू शकतो. खरंतर, पॉकेट्स अॅपद्वारे (pocket wallet) गॅस सिलिंडर बुक (LPG Cylinder Booking) केल्यावर ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. विशेष बाब म्हणजे हे अॅप ICICI Bank द्वारे सर्पोटेड आहे. 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक तुम्ही पॉकेट्स अॅपद्वारे 200 रुपये किंवा त्याहून अधिक बिल पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. या ऑफरसाठी ग्राहकांना कोणताही प्रोमोकोड वापरण्याची गरज नाही. पण लक्षात ठेवा ही ऑफर एका महिन्यात फक्त 3 बिल पेमेंटवर वॅलिड असेल. कंपनीच्या नियमांनुसार एका तासात फक्त 50 यूजर्स या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. सर्वात चांगला भाग म्हणजे तुम्ही बिल पेमेंटवर एका तासात 1 रिवॉर्ड/कॅशबॅक आणि एका महिन्यात 3 रिवॉर्ड/कॅशबॅक जिंकू शकता. नवीन घर घ्यायचा विचार करताय? 'ही' कंपनी देतेय 6.46 टक्के व्याजदराने होम लोन अशा प्रकारे तुम्ही एलपीजी सिलेंडर बुक करताना कॅशबॅक मिळवू शकता >> तुमचे पॉकेट्स वॉलेट अॅप उघडा. >> रिचार्ज आणि पे बिल सेक्शनमध्ये जा. >> आता Choose Billers मध्ये More च्या पर्यायावर टॅप करा. >> यानंतर तुम्हाला LPG चा पर्याय दिसेल. >> सर्व्हिस प्रोव्हायडर सिलेक्ट आणि तुमचा मोबाइल नंबर एंटर करा. >> आता सिस्टम तुम्हाला बुकिंग रकमेची माहिती देईल. >> बुकिंगची रक्कम भरा. >> व्यवहारानंतर, 10 टक्के दराने, तुम्हाला जास्तीत जास्त 50 रुपयांच्या कॅशबॅकसह रिवॉर्ड मिळेल. तुम्ही तुमचे पॉकेट वॉलेट उघडताच कॅशबॅकची रक्कम जमा केली जाईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Icici bank, LPG Price, Money

    पुढील बातम्या